कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदलणार ; या कारणामुळे घेतला मूर्ती बदलाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | साडेतीन शक्तिपीठा पैकी एक असणाऱ्या कोल्हापूर निवासिनी अंबाबाईची मूर्ती भग्न पावत चालल्याने त्या मूर्तीला बदलण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. अत्यंत जुनी असलेल्या मूर्तीची झीज होत चालली आहे. त्यामुळे रोजच्या स्पर्शाने आणि अभिषेकाने हि मूर्ती पूर्णपणे झिजून जाऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोल्हापूर येथील मंदिराचा कारभार पश्चिम महाराष्ट्र मंदिर समिती मार्फत पहिला जातो. त्या समितीच्या अध्यक्षांनी अंबाबाईच्या मूर्ती समान मूर्ती पाहण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये या नव्या मूर्ती बद्दल चर्चा सुरु झाली आहे. प्रशासकीय पातळीवर या बद्दल कोणीच दुजोरा दिला नसला तरी यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोल्हापूर येथील अंबाबाईची मूर्ती झिजू नये म्हणून त्याला मूर्ती तज्ञांकडून कोटिन देखील करून घेण्यात आले होते. तरी देखील या मूर्तीची झीज थांबत नसल्याने हि मूर्ती बदलण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

Leave a Comment