छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणाचा संघर्ष टोकाला, पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामुळे ‘या’ शहरास छावणीचे स्वरूप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जत येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे दिवसेंदिवस प्रकरण चिघळत आणि संघर्ष वाढत चालल्याने प्रशासनाने मोठी दखल घेत जतमध्ये मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जत शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणाचा संघर्ष टोकाला गेला आहे. शिव जयंतीपूर्वी हा पुतळा कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवाजी पेठेतील चबुतऱ्यावर बसवण्याचा घाट घातला आहे अशी टोकाची भूमिका पुतळा समितीने घेतली आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ट्रकमधून खाली उतरवण्यात आला आहे गेल्या चार दिवसांपासून छत्रपती शिवरायांची सकाळ संध्याकाळ आरती केली जात आहे. पुतळा समितीचे अध्यक्ष माजी आमदार विलासराव जगताप यांच्या पेट्रोल पंपावर हा पुतळा असला तरी या ठिकाणीसुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जत शहरात छत्रपती शिवाजीराजे पुतळा प्रकरणामुळे वातावरण तापले आहे.

जत शहरात 1300 पोलिस बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी राखीव दलाच्या चार तुकड्या सुद्धा जत मध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या मोठ्या बळामुळे जत शहरास पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Leave a Comment