Wednesday, October 5, 2022

Buy now

शब्द पाळला ! अमोल कोल्हेंनी बैलगाडा शर्यतीत घोडीवर बसून मारली बारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बैलगाडा शर्यतीवरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे खुले आव्हान दिले होते. शर्यतींमध्ये घाटात गाड्यासमोर घोडीवर बसायचे असेल तर लांडेवाडीला या, असे पाटील यांनी म्हंटल्यावर त्यांना कोल्हे यांनी मी शब्द पाळणार असे आव्हान दिले होते. ते आज त्यांनी पाळले. पुण्यातील निमगाव दावडी येथील घाटातील बारीत खासदार कोल्हे यांनी घोडीवर बसून बारी मारली.

पुण्यातील निमगाव दावडी येथे आज बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले. यावेळी शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी घोडीवर बसून, बैलजोडी समोर बारी मारली.

डिसेंबर 2021 च्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने विविध अटी व शर्ती घालत बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली. बैलगाडा शर्यत सुरु करण्याबाबत आढळराव आणि कोल्हे यांच्यात द्वंद्व सुरु असते. या पार्श्‍वभुमीवर आढळराव यांनी कोल्हे यांना उपरोधिक आव्हान दिले होते.ते आज कोल्हे यांनी पूर्ण केले.

बैलगाडा शर्यतीवरुन घेरणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं – कोल्हे

पुण्यातील निमगाव दावडी येथील घाटातील बारीत खासदार कोल्हे यांनी घोडीवर बसून बारी मारली. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,  “पहिली शर्यत सुरु झाली तेव्हा संसद अधिवेशन सुरु होते. ज्यांनी बैलगाडा शर्तीबाबत आक्षेप घेतला त्यांची 50 टक्के उपस्थिती होती. त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी तिकडे नव्हतो. आज बैलगाडा शर्यतीबाबत जो निकाल दिला आहे. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालय आणि महाविकास आघाडी सरकारचे मी आभार मानत आहे. शर्तीच्या आयोजनामुळे ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळतेय. मात्र, आता मी बैलगाडा शर्यतीवरुन घेरणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे,” असा टोलाही यावेळी कोल्हे यांनी पाटील यांना लगावला.