दहावी बारावी परीक्षेच्या भरारी पथकात राहणार आरोग्य विभागाचे पथक

Exam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी व परीक्षा केंद्राना भेटी देवून पहाणीसाठी शासनाच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती (भरारी पथक) स्थापन केली जाते. यामद्ये पोलिस आयुक्तालय, जिल्हा परीषद, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असतो. यंदा कोरोनाच्या अनुषंगाने या भरारी पथकात आरोग्य विभागाचा देखील समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी, बारावी परीक्षा औरंगाबाद विभागातील बीड, जालना, औरंगाबाद, परभणी आणि हिंगोली या पाचही जिल्ह्यामंध्ये चार मार्च ते चार एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार टाळण्यासाठी, परीक्षा सुरळीत संचलनाकरिता तसेच परीक्षा केंद्रांना भेटी देवून पहाणी करण्याकरीता पोलिस आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी (आयुक्तालय असलेल्या जिल्ह्यासाठी)
पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, (जिल्हा परीषद), शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक), जिल्हा शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण), जिल्हा परीषद (सदस्य, सचिव) यांचा समावेश असतो.

मात्र, यंदा कोरोनाच्या अनुषंगाने दहावी-बारावी परीक्षेच्या कालावधीत जिल्हा दक्षता समितीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका स्तरावरील आरोग्य अधिकारी यांचा समावेश करण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्र, उपकेंद्रासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे आवश्यक ते सहकार्य मिळावे, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे फिरते पथक ठेवण्यात येणार आहे.