हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील सोनी मराठी वाहिनीवर आजपासून ‘गाथा नवनाथांची’ नाथ संप्रदायावर आधारलेली नवी कोरी आध्यात्मिक मालिका प्रकाशित होणार आहे. मुख्य म्हणजे टेलिव्हिझनच्या इतिहासात पहिल्यांदाच नाथ संप्रदायावर मालिका तयार झाली आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांनाही मालिकेविषयी प्रचंड उत्सुकता आहे. शिवाय मालिका सुरु होण्याआधी आता या मालिकेच्या शिर्षक गीताचे मेकिंग प्रदर्शित करण्यात आले आहे. यातील प्रमुख बाब अशी कि, बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी हे शिर्षक गीत त्यांच्या आवाजात गेले आहे. यामुळे मालिकेचे शीर्षक गीत अतिशय लयबद्ध आणि लक्षवेधक ठरले आहे.
https://www.instagram.com/p/CQX8SIQJJxS/?utm_source=ig_web_copy_link
‘गाथा नवनाथांची’ या मराठी मालिकेचे शीर्षकगीत गुरू ठाकूर यांनी लिहिले आहे. तर पंकज पडघण यांनी ते संगीतबद्ध केले आहे. मुळात हिंदी भाषिक असणाऱ्या कैलास खेर यांच्या आवाजात मराठी मालिकेचे शीर्षक गीत होणे हि बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. यामुळे अनेकांचे लक्ष वेधून घेण्यास हे शीर्षक गीत यशस्वी झाले आहे.
https://www.instagram.com/tv/CQTKr4upV37/?utm_source=ig_web_copy_link
ह्या मालिकेचे कथानक अन्य मालिकांपेक्षा वेगळे आहे. नाथ संप्रदाय हा असा संप्रदाय आहे ज्याबाबत फारसे लोक आजही कित्येक गोष्टी जाणत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबाबत अनेक गोष्टींबाबत लोक संभ्रमित आहेत. नवनाथ ग्रंथाचं अनेकांच्या घरी पारायण केलं जातं, मात्र अनेक गोष्टींचा उलघडा आजही झालेला नाही. म्हणूनच कधीही न पाहिलेली आणि काठीही न जमलेली कथा घेऊन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
https://www.instagram.com/p/CQWDYWRqXl6/?utm_source=ig_web_copy_link
या मालिकेचा प्रोमो फार आधीच प्रदर्शित करण्यात आला होता. तर २१ मे २०२१ रोजी हि मालिका सोनी मराठी टीव्हीवर दिसणार होती. पण लॉकडाउनमुळे ते काही शक्य झाले नाही. त्यानंतर आजपासून अर्थात २१ जून २०२१ पासून हि आगळी वेगळी मात्र पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये अतिशय पुरातन काळ दाखवण्यात आलेला आहे. तर अलख निरंजनच्या घोषणाही आपणास ऐकू येत आहेत. मालिकेतील पात्रांची वेशभूषा, बोलीभाषा, राहणीमान हे पूर्णपणे त्या काळाला शोभेल असे आहे. त्यामुळे पौराणिक मालिका आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही नक्कीच पर्वणी ठरणार आहे, यात काही वादच नाही.