Monday, February 6, 2023

लघुशंकेसाठी गाडी थांबवताच दोघांचा हल्ला

- Advertisement -

औरंगाबाद : पूर्व वैमनस्यातून दोघांनी एका तरुणावर चाकूने हल्ला केला, यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गोलवाडी टोक्याजवळ बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. अजय तळणकर असे जखमी तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी असून सध्या त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहे. गणेश पठारे (रा.बेगमपूर) व कपूर सलामपुरे (रा.गोलवाडी) असे आरोपींचे नावे आहेत.

बुधवारी साडेबाराच्या सुमारास तिसगाव शिवारातील शुभम गाडगे (२६,रा.म्हाडा कॉलनी) बांधकाम व्यावसायिक आहे.तो त्याचा मित्र प्रलय बोदले, मनेश गाडे, अजय तळणकर, आनंद भालेराव आणि ऋषी काटकर, कारने (एमएच-१४डीएन-८३५४) हे तिसगाव, म्हाडा कॉलोनीतुन शहराकडे जात होते. अजय हा कार चालवत होता. त्याच दरम्यान रात्री साडेबाराच्या सुमारास अजय लघवी करण्यासाठी गाडीतून उतरला. त्याच वेळी तेथे आलेल्या दोन हल्लेखोरांनी अजयला शिवीगाळ सुरू केली, तसेच १९ जुलै रात्री दीडच्या वेळेत ‘तूच आमच्यासोबत भांडण करून निघून गेला होता. असे म्हणत एका हल्लेखोराने अजयच्या गालात चापट मारली. त्यांना प्रत्युत्तर देत अजून देखील आरोपीला मारले. दोघेही एकमेकांची कॉलर धरून हाणामारी करू लागले होते. हा सर्व प्रकार अजयचे मित्र कार मधून खाली उतरले, हा प्रकार चालू असताना त्यावेळी एकाने अजयला शिवीगाळ करून त्याच्या वर धारदार चाकूने त्याच्या छातीच्याखाली व पोटावर उजव्या बाजूने चाकूने हल्ला केला.

- Advertisement -

ह्या हल्ल्यात अजय गंभीर जखमी झाला आणि रक्तबंबाळ होवून जमिनीवर कोसळला, त्याला अशा अवस्थेत बघून त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. यामुळे टोलावडा नाक्यावरील कर्मचारी तिथे पोहचले, हे बघताच दोन्ही हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. त्यानंतर अजयला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच पोलीस रुग्णालयात पोहोचले, या संबधी पहाटे दोन्ही हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक सचिन वायाळ करत आहेत.