व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पाण्याची मोटार चोरी करताना रंगेहाथ दोघांना पकडले

कराड | कोळे येथे दुकानात दुरूस्तीस आलेली मोटारीची चोरी करताना रंगेहाथ दोघांना पकडण्यात आले आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशितोष संभाजी भोसले (वय 21 वर्ष, रा. सैदापुर विद्यानगर, कराड), सईद रियाज पटेल (वय- 24 वर्षे, रा. ओगलेवाडी ता. कराड) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत मनोज निवास थोरात (वय- 36, रा. आंबवडे- कोळे, ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी मनोज थोरात हे आणे (ता. कराड) येथे माझे मित्राचे घरी कामानिमित्त गेले होते. त्यावेळी माझ्या अंबिका इलेक्ट्रीक या दुकानात आमचे गावातील राजकुमार भाऊ पाटील यांचे मालकीची पाण्याची मोनोब्लॉक टेक्स्मो कंपनीची मोटार दुरुस्तीकरिता दिलेली होती. सदर मोटार दुरुस्त करुन घराच्या आंगणात ठेवली होती. त्यानंतर काम झाल्यानंतर पुन्हा घरी माघारी येत असताना रात्री 11. 45 वा चे सुमारास दोन अनोळखी इसम पाण्याची मोटार घेवुन निघाल्याचे दिसून आले. त्यावेळी संशयितांची मोटार सायकल (MH- 50-S- 8810) आडवून तुम्ही कोण, मोटार कुठे घेवुन चाललात असे विचारले. त्यावेळी ते मला उडवाउडवीची उत्तरे देवु लागले.

त्यावेळी सदरील मोटारची पाहणी केली असता मोटार माझेकडे दुरुस्तीला आलेलीच मोटार असल्याचे दुकानदाराची खात्री झाली. तेव्हा मोटार सायकलची चावी काढुन घेवुन गावचे ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश शेवाळे तसेच घराचे बाजुला राहणारे शेजारी आले. संशयित उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने कराड तालुका पोलीस ठाणेस फोन करुन सदर बाबत माहिती दिली. पोलीस अंमलदार यांनी अनोळखी इसमास विश्वासात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.