पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये मटणाच्या सुपात भात आल्याने वेटरची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुणे हादरलं आहे. काही दिवसांपूर्वी जुन्नर येथे एकाने तंबाखूसाठी पैसे दिले नाही म्हणून डोक्यात फावडे टाकून हत्या (brutal beating) करण्यात आल्याची घटना घडली होती. हि घटना ताजी असताना पिंपळे सौदागर परिसरात असणाऱ्या सासुरवाडी नावाच्या हॉटेलमध्ये मटणाच्या सुपात भाताचे कण दिसल्याने वेटरची हत्या (brutal beating) करण्यात आली. या घटनेमुळे पुणे हादरलं आहे.
दोघांवर गुन्हा दाखल
वेटरला मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयराज वाघिरे आणि त्याच्या साथीदारांवर या वेटरच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे आरोपी फरार झाले आहेत. या प्रकरणी विशाल महादू रजाळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मंगेश पोस्ते असे हत्या (brutal beating) झालेल्या वेटरचे नाव आहे. मंगेशला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या अजित मुटकुळे आणि सचिन भवर या दोन वेटरलादेखील आरोपींनी मारहाण केली.
जेवताना मटणाच्या सुपात भाताचे कण, दोघांनी वेटरला केली बेदम मारहाण, वेटरने सोडले प्राण : पहा व्हिडिओ pic.twitter.com/api2VzKrub
— Azroddin Shaikh (@azars_007) November 17, 2022
कुठे घडली घटना?
हि घटना पिंपळे सौदागर परिसरात असलेल्या हॉटेल सासुरवाडी या हॉटेलमध्ये घडली आहे. आरोपी विजयराज आणि त्याचा मित्र हे नेहमी या ठिकाणी जेवायला जात होते. त्यांनी आपल्या जेवणाची ऑर्डर वेटरला दिली. वेटरने आरोपींनी दिलेल्या ऑर्डरप्रमाणे जेवणदेखील आणले. मात्र त्यांच्या मटणाच्या सूपमध्ये भाताचे काही कण आढळून आले, ते पाहून आरोपी विजयराज आणि त्याचा साथीदार यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी वेटर अजित अमूत मुठकुळे, सचिन सुभाष भवर आणि मृत मंगेशला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण (brutal beating) केली. या मारहाणीत मंगेश पोस्ते या वेटरचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी आणि त्याचा मित्र हे घटनास्थावरून फरार झाले.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!