मुलगी मिळेना अन् लग्नच होईना, याच नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये वयाची तिशी ओलांडली तरी लग्न जुळत नसल्यामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावामध्ये हि घटना घडली आहे. चेतन खरोटे असे या मृत तरुणाचे नाव आहे. चेतन खरोटे हा गेल्या काही दिवसांपासून लग्न होत नसल्याच्या कारणामुळे चिंतेत होता. अनेक वेळा त्याने त्याच्या मित्राजवळ ही खंत देखील व्यक्त केली होती. यामुळे तो व्यसनाच्या आहारी गेला होता.

मागच्या तीन ते चार दिवसांपासून चेतन खरोटे हा त्याच्या आईला वारंवार लग्न होत नसल्याचा तगादा लावीत होता. याच विवंचनेत असलेला चेतन गेल्या तीन दिवसांपासून व्यसनाच्या जास्त आहारी गेला होता. यामुळे चेतनची आई देखील गेल्या दोन-तीन दिवसांपासून आपल्या नातेवाईकांकडे निघून गेली होती. याच संधीचा फायदा उचलत चेतनने घर आतून बंद करून घेतले आणि घराच्या छतावरील कडी-कोयंड्याला दोरी बांधून गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला.

बराच वेळ झाला तरी घरातून कोणी बाहेर येत नसल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. यानंतर त्यांनी चेतनच्या आईला त्याची माहिती दिली. यानंतर त्यांनी चेतनच्या आईला माहिती दिली. तेव्हा घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता चेतनने आत्महत्या केल्याचे आढळून आले. यानंतर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर चेतनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. लग्न होत नसल्यामुळे चेतनने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment