कोरोना बचाव निधी उभारण्यासाठी केरळमधील तरुणांनी वापरला ‘हा’ नवीन फंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले तीन चार महिने केरळमध्ये सुरु असणाऱ्या कोरोना संकटात मदत निधी उभा करण्यासाठी केरळमधील नागरिकांनी अनेक कौशल्यपूर्ण मार्ग निवडले आहेत. ज्याची चर्चाही झाली आहे. कोल्लम मध्ये ६० वर्षाच्या महिलेने तिच्या उत्पन्नाचे साधन तिची शेळी मदतनिधी देण्यासाठी विकली, एर्नाकुलम मध्ये आपल्या सायकलच्या सामानासाठी जमा केलेले पैसे एका मुलाने मदत म्हणून दिले. कासारगोड मधील एका कुटुंबाला त्यांच्या घरातील सहा लोकांना कोरोना झाला होता, त्यांना डिस्चार्ज च्या वेळी मुख्यमंत्री सहायता निधीमधून एक लाखाचा चेक देण्यात आला. आता राज्यातील इडुक्की जिल्ह्यात तरुण स्वयंसेवकांचा एक संघ एलईडी बल्ब तयार करून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पैसे गोळा करत आहे.

केरळ राज्य युवा कल्याण मंडळांच्या सदस्यांनी ही नामी कल्पना शोधली आहे. या माध्यमातून केरळमधील कोरोना संकटासाठी बचाव निधी देण्याचे त्यांनी ठरविले आहे. या संस्थेने बल्ब तयार करण्यासाठी मध्यप्रदेशमधून कच्चा माळ खरेदी करून या कामात रस असणाऱ्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले. गेल्या पाच दिवसात थोडुपुझा शहरातील १० स्वयंसेवकांनी ९ व्हॅट चे ६०० बल्ब तयार केले आहेत. संस्थेद्वारे त्यांच्या भोजन व प्रवासाची काळजी घेतली जात आहे. पण या कल्पनेमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. यापूर्वीही या संस्थेने अशा अनेकविध संकल्पना राबवून मदतकार्यात वाटा उचलला आहे.

२०१८ साली आलेल्या पुराच्या काळात संस्थेने केरळ स्वयंसेवी युवा कृती दल उभा केला होता. जो मदतकार्यात सक्रिय होता. राज्यातील १६०० स्वयंसेवकांना एकत्रित करून त्यांना संबंधित प्रशिक्षण देण्यात आले होते. पुराच्या काळात लोकांना औषधे पुरविणे, सामुदायिक स्वयंपाकघरात काम करणे, साफसफाई करणे अशी कामे हे स्वयंसेवक करत होते. सध्या हा प्रकल्प इडुक्की जिल्ह्यात प्राथमिक पातळीवर आहे. तो यशस्वी झाल्यास इतर जिल्ह्यातही राबविला जाणार असल्याची माहिती संस्थेने दिली आहे. एखाद्याच्या घरी जाऊन त्याला मदतीसाठी १०० रु द्या म्हणण्यापेक्षा बल्ब खरेदी करण्यास सांगणे सोपे जाते असे संस्थेचे एक सदस्य बिंदू म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment