औरंगाबाद – मेडिकलची बनावट चावी बनवून मित्राने आपल्या मित्राच्या मेडिकलमध्ये चोरी करून महागडे इंजेक्शन , औषधी रोख असा सुमारे ३० हजाराचा ऐवज चोरी केल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास समर्थनगर भागात समोर आली. चोरी करताना आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. यामुळे मित्रानेच आपल्या मित्राचा घात केल्याची चर्चा परिसरात सुरु होती.
याप्रकरणी आधी माहिती अशी कि, अंकुश पुंडलीक गायकवाड (28, रा.समर्थनगर, औरंगाबाद) यांचे समर्थनगर भागात धन्वंतरी जेनेरिक मेडिकल नावाने औषधी दुकान आहे. गायकवाड यांनी नेहमी प्रमाणे शुक्रवारी रात्री दुकान बंद केली.आज सकाळी जेंव्हा त्यांनी दुकान उघडले तेंव्हा गल्ल्यात ठेवलेले सुमारे १० हजार रुपये दिसले नाही. कोणीही मेडिकल उघडला नाही मग रात्री ठेवलेले गल्ल्यातील पैसे गेले कुठे ? असा प्रश्न गायकवाड यांना पडला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यामध्ये ओळखीचाच मित्र चावीने मेडिकल उघडून आत प्रवेश करीत असल्याचे दिसले. गायकवाड यांनी ही माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मेडिकल मधून फ्रीज मध्ये ठेवलेले शुगर, बीपी रुग्णासाठी वापरली जाणारी इंजेक्शन, औषध व गल्ल्यातील रोख असा सुमारे ३० हजाराचा ऐवज लंपास झाल्याचे मेडिकल चालक गायकवाड यांनी सांगितले.
गुन्हा दाखल होण्याअगोदर आरोपी गजाआड
चोरी झाल्याची माहिती मिळताच गुन्हेशाखेचे आणि क्रांतिचौक पोलिसांचे पथक घटनस्थळी दाखल झाले होते.सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची ओळख पटवीली. आरोपी त्याच्या खोलीत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी हा गायकवाड यांच्या ओळखीचा आहे. तो नेहमी मेडिकलवर यायचा आज सकाळी मेडिकल उघडण्याआधी तो मेडिकलवर आला व त्या जवळील एका चावीच्या साहाय्याने त्याने चोरी केली आणि पुन्हा दुकान बंद करून निघून गेला.तो नेहमी दुकानात येत असल्याने शेजाऱ्यांना देखील त्यावर संशय आला नाही. यापूर्वी देखील त्याने दुकानात चोरी केली असावी अशी शक्यता गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.