सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
कुपवाड शहरातील बाबावली सय्यद यांच्या घरातील तिजोरीमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसुत्र, अंगठी व रोख २३ हजार असा एकूण ३९ हजार रुपयांची चोरी अज्ञान चोरट्यांनी केली असून याबाबत कुपवाड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
बाबावली सय्यद हे रामकृष्णनगर मध्ये पत्नी, दोन मुलासह राहतात. शुक्रवारी रात्री जेवण करून उकाडा असल्याने झोपताना त्यांनी घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. या संधीचा फायदा अज्ञान चोरट्यांनी घेऊन त्यांच्या घरातील तिजोरीत ठेवलेले सोन्याचे मणी मंगळसुत्र, अंगठी व रोख २३ हजार रुपये असा एकूण ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
दरम्यान याबाबत कुपवाड पोलिसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हवालदार राजू बोद्रे तपास करीत आहेत.