नांदेड : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही महिन्यांपासून चोरटयांनी ठिकठिकाणी मोठा उच्छाद मांडला आहे. अशीच एक चोरीची (theft) घटना नांदेडमध्ये घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी (theft) काळे- पांढरे कपडे परिधान करून तोंडाला रुमाल बांधून सिरंजनी येथील हनुमान मंदिराच्या गेटमधून प्रवेश केला. त्यांनंतर त्यांनी मंदिराच्या दानपेटीचे कुलूप फोडून अंदाजे अर्धा किलो सोने-चांदी, व 25 हजारांची रोकड लंपास केली. गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वी झालेल्या चोरीमुळे (theft) नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरटयांनी देवाच्या गाभाऱ्यातील दानपेटी फोडून लाखोंचा ऐवज केला लंपास, CCTV फुटेज आले समोर pic.twitter.com/QkagNUWg3i
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 28, 2022
चोरी CCTV मध्ये कैद
चोरीचा (theft) हा सर्व प्रकार मंदिर प्रशासनाने बसविलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हि चोरी करताना चोरटयांनी तोंडावर रुमाल बांधला असल्याचे CCTV कॅमेऱ्यात दिसत आहे.
चार घरांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
या चोरटयांनी (theft) मंदिरामध्ये चोरी केल्यानंतर आपला मोर्चा गावातील तीन ते चार घराकडे वळविला त्यामध्ये बाबुराव गड्डमवार या व्यक्तीच्या घरात शिरून आलमारी फोडून नासधूस केली असून त्यांच्या घरातील सदस्यांना जाग येताच चोरट्यांनी तिकडून पळ काढला.
चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
हिमायतनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठं गाव म्हणून सिरंजनी गाव प्रसिद्ध आहे. आतापर्यंतच्या काळात या गावात कधीही चोरी (theft) झाली नव्हती. त्यामुळे आता या चोरट्यांच्या टोळीला पकडण्याचे आवाहन हिमायतनगर पोलिसांसमोर असणार आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???