हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “रुग्ण वाढतायेत, लॉकडाऊन शिवाय आता मार्ग नाही. 9 जणांचा अंत्यविधी एकाच सरणावर झाला. उद्या 25 जणांचा एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची वेळ येईल. त्यामुळे लॉकडाऊन हे केलंच पाहिजे”, असं मत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मांडलं. मुंडे यांनी नुकतीच अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
मुंडे म्हणाले, कोरोनाच्या काळात यंत्रणा म्हणून आम्ही कमी पडलो. प्रशासन म्हणून आपण काळजी घेतली नाही. जनतेने तर काळजी घेतलीच नाही तर परिस्थिती गंभीर होईल याचा अंदाज मी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मांडला होता. आता सर्व झटकून कामाला लागा. जिल्ह्यात ऑक्सिजनचे 2500 बेड तयार, नव्याने एक हजार ऑक्सिजनचे बेड तयार करणार. बेड कमी पडले तर खासगी रुग्णालये ताब्यात घ्या, अशा सूचना मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर आता कडक लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे.