हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये बराच फरक असल्याचे मत व्यक्त केलं आहे. बाळासाहेब हे सत्तेमागील प्रमुख व्यक्तीमत्व होतं तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असून त्यांना प्रत्यक्ष कारभार चालवायचा असल्याचे हा फरक असणे स्वाभाविक असल्याचेही पवारांनी म्हटलं आहे. ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, या मुलखतीत पवारांनी बाळासाहेब आणि उद्धव यांच्यांसंदर्भातील विषयावर मनमोकळेपणे गप्पा मारल्या.
बाळासाहेब आणि उद्धव यांच्यामध्ये फरक आहे. बाळासाहेब हे तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळे व्हायचे, असं राऊत यांनी म्हटल्यानंतर, “बाळासाहेब आणि उद्धव यांच्यामध्ये हा फरक आहे. बाळासाहेब हे सत्तेच्या पाठीमागचा एक महत्वाचा घटक होते. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रात सत्ता चालली हे महाराष्ट्राने आणि देशाने बघितली. आज सत्ता विचारांनी चालली नाही आज प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून सत्ता चालवण्याची जबाबदारी उध्दव ठाकरेंवर आहे. त्यामुळे हा मोठा फरक दोघांमध्ये आहेच,” असं पवारांनी एका प्रश्नला उत्तर देताना म्हटलं.
देशातील काही राज्यांनी ज्याप्रमाणे अर्थचक्र सुरु करण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला तसचं काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रातही लॉकडाउनमध्ये मूभा देण्याची गरज अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने गरजेची असल्याचे मत पवारांनी मांडले. “देशाची समाजाची आणि राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाल्यास करोनापेक्षा त्याचे दृष्परिणाम पुढील काही पिढ्यांना सहन करावे लागतील, असेही शरद पवार म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.