या देशांमध्ये अद्याप एकही कोरोनाग्रस्त नाही, घ्या जाणुन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिसेंबर २०१९ मध्ये, चीनच्या हुबेई प्रांतात उद्भवलेल्या कोरोना विषाणूने अवघ्या काही आठवड्यांतच जगभरात विनाश करण्यास सुरवात केली. आता परिस्थिती अशी आहे की १८ लाख ५० हजारांहून अधिक लोक कोरोनाने पॉझिटिव्ह बनले आहेत, तर १ लाख १० हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. लॉकडाऊन दरम्यानच, एक वैज्ञानिक साथीचा हा आजार बरा करण्याचा प्रयत्न करीत आहे.तुर्कमेनिस्तानच्या अधिकृत आरोग्य आकडेवारीनुसार,तेथे कोरोना नावाची कोणतीही गोष्ट नाहीये. येथे दररोजचे जीवन सामान्यपणे चालू आहे आणि सणांमध्ये देखील गर्दी जमत आहे.

प्रकरण लपवण्याची भीती
या सर्व तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की लॉकडाउनमधून जायाला लागु नये म्हणून येथील सरकार प्रकरण लपवित आहे.मीडिया स्वातंत्र्य आणि सेन्सॉरशिपच्या बाबतीत हा देश अत्यंत कठोर होता,त्यामुळे अशी शंका घेण्यास वाव आहे. तुर्कमेनिस्तानची तुलना ही उत्तर कोरियाशी केली जाते. ३१ मार्च रोजी रिपोर्टर विथ बॉर्डर्स (आरएसएफ) यांनी हा देश वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्सच्या सर्वात खालच्या स्थानी ठेवला म्हणजे प्रेसला येथे काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य नाहीये. आरएसएफच्या म्हणण्यानुसार देशाची राजधानी अश्गाबा येथे कोरोना शब्द बोलण्यासही बंदी आहे. तथापि, नंतर या बातमीवरून बर्‍यापैकी खळबळ उडाली होती, त्यानंतर आरएसएफने आपल्या हेडमध्ये थोडा बदल केला होता, परंतु तरीही अर्थ असा होता की या देशात कोरोनाबद्दल बोलण्यास मनाई आहे.

मीडिया काय म्हणतो
स्थानिक मीडिया तुर्कमेनिस्तान क्रॉनिकल देखील म्हणतो की देशात जारी केलेल्या अधिकृत बुलेटिनमध्ये कोरोना विषाणूचा कोणताही उल्लेख नाहीये, तर यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अगदी आरएफई / आरएल च्या तुर्कमेना सर्व्हिसने एका अहवालात सांगितले आहे की लोक कोरोनाबद्दल बोलत असतील तर साध्या गणवेशात तैनात असलेले पोलिस त्यांना अटक करत आहेत. तुर्कमेनिस्तान क्रॉनिकलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, शाळा, रुग्णालये आणि कार्यालयांमध्ये वितरित करण्यात आलेल्या आरोग्य बुलेटिनमध्ये कोरोनाचा कुठेही उल्लेख नाही,जिथे २५ मार्च पर्यंत त्याविषयी सांगितले जात होते. मजेशीर गोष्ट म्हणजे तुर्कमेनिस्तान क्रॉनिकल हे या देशातील काही मोजक्या मुक्त स्त्रोतांपैकी एक आहे परंतु त्याच्या स्वत: च्या देशातच त्यावर बंदी आहे.

गेल्या एका महिन्यात काय बदलले आहे
मार्चमध्ये देशाचे सरकार कोरोना बाधित देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणत होते. याबद्दल शेवटची बातमी २५ मार्च रोजी आली होती, परंतु त्यानंतर कोरोनाबद्दल कोणत्याही बातमीचे प्रकाशन झालेले नाही किंवा कोणतीही माहिती मिळाली नाही. तथापि, सरकारने असे म्हटले आहे की त्यांनी संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजना यापूर्वीच अवलंबिल्या आहेत, त्यामुळे देशाने हा संसर्ग टाळला आहे. येथे फेब्रुवारीमध्ये चीन आणि आसपासच्या देशांच्या हवाई प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. याव्यतिरिक्त, सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे तुर्कमेनिस्तानच्या राजधानीऐवजी तुर्कमेनाबादकडे वळविली गेली जेणेकरून राजधानीमध्ये हा संसर्ग पसरू नये. या ठिकाणी क्वारंटाईन झोन तयार करण्यात आला होता, जिथे इतर देशांतील नागरिकांना १४ दिवस ठेवण्यास सांगितले गेले, परंतु त्यानंतरचा कोणताही डेटा दिला गेला नाही.

लपविण्याचा इतिहास
केस नसल्याबद्दल भीती देखील वाढते कारण यापूर्वी येथे बरेच रोग लपवले गेले आहेत. तुर्कमेनिस्तानच्या हेल्थकेअर सिस्टमवरील संशोधक आणि लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रोपिकल मेडिसिनचे प्राध्यापक मार्टिन मिकी यांचे मत असा आहे की, देशातील सरकारी आकडेवारी काय म्हणत आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, विशेषत: या देशातील खराब हेल्थकेयर सिस्टमवर. गेल्या दशकात एचआयव्ही / एड्सचा एकही रुग्ण येथे आला नाही. गेल्या दशकात प्लेगसारखे अनेक आजारही येथे पसरले होते, परंतु आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये याबद्दल कोणतीही बातमी दिली गेली नाही.

एकीकडे देश स्वत: झिरो केसेसचा दावा करीत आहे, तर दुसरीकडे सरकारी अधिकारी या रोगाविषयी यूएनशी चर्चाही करत आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, यूएनच्या स्थानिक अधिकारी एलेना पनोवा सांगतात की केस येताच ते प्रयोगशाळेच्या चाचण्या आणि उपचार सुविधा मिळावेत यासाठी त्यांच्या पातळीवर प्रयत्न करीत आहेत.तसे, तुर्कमेनिस्तान वगळता इतरही अनेक देश आहेत, जिथे कोरोना केसेस असल्याचा दावा केला जात नाही. त्यापैकी किरीबाती, लेसोथो, मायक्रोनेशिया, नॉरू, उत्तर कोरिया, पलाऊ, सामोआ, सलमान बेट, दक्षिण सुदान, ताजिकिस्तान, टोंगो आणि तुवालू इत्यादी देशांचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment