काबूल । तालिबानचा सर्वोच्च नेता असलेला हैबतुल्लाह अखुंदजादा सध्या कुठे आहे? अफगाणिस्तानात तालिबानने ताबा मिळवल्यानंतरही त्यांच्या प्रमुखाविषयी काहीही माहीती नाही. अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, तालिबानचा सर्वोच्च नेता हैबतहुल्ला अखुंदजादा कुठे आहे? तो दिसत का नाही, कोणी त्याला कैद तर केलेले नाही ना? तालिबानचा माजी नेता अख्तर मन्सूर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्यानंतर मे 2016 मध्ये हैबतुल्लाह अखुंदजादाची या दहशतवादी गटाचा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी तालिबानने शेअर केलेल्या एका व्हिडिओ मेसेजनुसार, हैबतुल्लाह अखुंदजादा दहशतवादी मन्सूरचा डेप्युटी होता, मात्र ड्रोन हल्ल्यात झालेल्या त्याच्या मृत्यूनंतर तो सिंहासनावर आला. पाकिस्तानमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान त्याला तालिबानचा सर्वोच्च नेता म्हणून बढती देण्यात आली.
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टमध्ये तालिबानचा प्रमुख, 50 वर्षीय हैबतुल्लाह अखुंदजादा याला सैनिकाऐवजी एक धार्मिक कायदेशीर पंडित असे म्हटले गेले आहे. या रिपोर्टनुसार, दहशतवादी गटाद्वारे इस्लामचे अर्थ लावण्याचे सर्व श्रेय त्याला दिले जाते. अखुंदजादाला ‘अमीर अल-मुमीमीन’ किंवा निष्ठावंतांचा कमांडर असे म्हणूनही ओळखले जाते. मात्र, त्याला अल-कायदा प्रमुख आयमान अल-जवाहिरीने 2016 मध्ये हे विशेषण दिले होते.
पूर्वी हैबतुल्लाह अखुंदजादा पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. संघटनेच्या एका सदस्याने सांगितले की,” अखुंदजादा गेल्या सहा महिन्यांपासून सार्वजनिकरित्या दिसून येत नाही. मे महिन्यात त्याने (अखुंदजादा) ईदच्या निमित्ताने एक निवेदन जारी केले होते. मात्र हे निवेदन अखंडजादानेच जारी केले होते ही गोष्ट अद्याप सिद्ध झालेली नाही.
फेब्रुवारीमध्ये मृत्यूची बातमी आली
अखुंदजादा अफगाणिस्तानच्या कंदहार प्रांतातील एक धार्मिक विद्वान आणि मूलतत्त्ववादी आहे. 1980 च्या दशकात अफगाणिस्तानवरील सोव्हिएत आक्रमणादरम्यान तो इस्लामिक प्रतिकारात सहभागी झाला होता, परंतु त्याला लष्करी कमांडर कमी आणि धार्मिक विद्वान अधिक मानले जाते. यावर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीला अशी माहिती समोर आली होती की, अखुंदजादाचा मृत्यू झाला. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, तालिबानचा प्रमुख आता नव्हे तर काही महिन्यांपूर्वीच एप्रिल 2020 मध्ये पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात झालेल्या स्फोटामुळे ठार झाला होता.
तालिबान मृत्यूची बातमी लपवतो
हैबतुल्लाह अखुंदजादा आधीच मरण पावला असण्याची शक्यता आहे पण तालिबान ते लपवत आहे जेणेकरून ही संघटना जगाला कमकुवत वाटू नये. यापूर्वीही त्यांनी असे केले आहे. 2013 मध्ये तालिबानचा संस्थापक नेता मुल्ला उमरच्या मृत्यूनंतर अख्तर मन्सूरला संघटनेचे प्रमुखपदही मिळाले होते. मात्र 2015 मध्ये ओमरच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली. जेव्हाही मृत्यूशी संबंधित अशा बातम्या येतात, तालिबान त्या पूर्णपणे नाकारतो. हश्त-ए-शुभ वृत्तपत्राने एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, “अखंडजादाचा मृत्यू क्वेट्टा येथील एका घरात झालेल्या स्फोटामुळे झाला. पण तत्कालीन तालिबान नेता अहमदुल्लाह वासिक यांनी याला “खोटी आणि निराधार अफवा” असल्याचे म्हटले.
मुलगा आणि भाऊही मारले
2017 मध्ये, अखुंदजादाचा मुलगा अब्दुर रहमान (23) एका आत्मघाती हल्ल्यात ठार झाला. जो अफगाणिस्तानच्या हेलमंद प्रांतात घडला. रहमान हाफिज खालिद म्हणूनही ओळखला जात होता. प्रांतीय राजधानी लष्कर गाहच्या उत्तरेला गेरेशक शहरात अफगाण लष्करी तळाला लक्ष्य करताना स्फोटकांनी भरलेले वाहन चालवताना रहमान ठार झाला. तालिबानचा मुख्य प्रवक्ता कारी युसूफ अहमदी याने ही माहिती दिली. त्याच वेळी, त्याचा भाऊ हाफिज अहमदुल्लाह 16 ऑगस्ट 2019 रोजी क्वेटापासून 25 किमी अंतरावर असलेल्या मशिदीत मारला गेला.