सचिन पायलट यांच्या हातात काही नाही, भाजपा सर्व खेळ खेळत आहे- मुख्यमंत्री गहलोत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर । “सचिन पायलट यांच्या हातात काहीच नाही. भाजपा सर्व खेळ खेळत आहे. भाजपाने रिसॉर्टची व्यवस्था केली असून ते सर्व काही हाताळत आहेत. मध्य प्रदेशात काम करणारी टीम येथे काम करत आहे,” असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. सचिन पायलट यांना राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरुन हटवण्याचीकारवाई करण्यात आल्यानंतर अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले असून भाजपाच्या सरकार पाडण्याच्या षडयंत्रात ते सहभागी होते असं म्हटलं आहे.

घोडेबाजार सुरु असल्याची आम्हाला कल्पना होता. अखेर हाय कमांडने निर्णय घेतला आहे. भाजपा देशभरात घोडेबाजार करत असून त्यात सहभागी आहे,” असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सचिन पायलटदेखील षडयंत्रात सहभागी होते असा आरोप केला. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गेहलोत यांनी राज्यपालांना गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडींची तसंच सचिन पायलट यांनी पुकारलेल्या बंडाची माहिती दिली.

दरम्यान, बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून अखेर कारवाई करण्यात आलेली असून उपमुख्यमंत्री पदावरुन त्यांना हटवण्यात आलं आहे. तसेच राजस्थान काँग्रेस परदेशाध्यक्ष पदावरूनही त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सचिन पायलट यांना या दोनही पदावरुन हटवलं जात असल्याची घोषणा केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment