स्वतःच्या गावात, जिल्ह्यातचं सत्ता नाही अन हे कसले प्रदेशाध्यक्ष?, हसन मुश्रीफांनी चंद्रकांत पाटलांवर डागली तोफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर । राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे आज निकाल लागले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भाजपाचा पराभव झाला. या पराभवाची सोमवारी निकाल लागल्यापासूनच जिल्ह्यात व माध्यमांवरही जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करायला एक आयतीच संधी मिळाली. तोच संदर्भ धरून दुपारी जिल्हा परिषदेच्या सदस्यांशी बोलताना त्यांनी ही संधी साधली.

गावात सत्ता नाही, जिल्ह्यात नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष, असे मी नव्हे तर भाजपाचाच एखादा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना म्हणू शकतो, अशी बोचरी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे केली. विशेष म्हणजे मुश्रीफ यांच्या जिल्हा परिषदेतील भेटीवेळी भाजपाचे सदस्यही उपस्थित होते.

त्यांनाही मुश्रीफ यांनी प्रत्येकी २५ लाखांचा विकास निधी दिला आणि भाजपाचे कारभारी सदस्य विजय भोजे यांच्याकडे पाहून मुश्रीफ म्हणाले, ‘अहो, ते खानापूरच्या निकालाचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही नेत्याच्या गावातल्या पराभवाची चर्चा जास्त होते. आता तुमच्यासारखा कार्यकर्ता असे म्हणू शकतो, की गावात सत्ता नाही, तालुक्यात सत्ता नाही, जिल्ह्यात नाही आणि प्रदेशाध्यक्षपद मात्र आहे.’

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’