तुमच्या कडून हि अपेक्षा नव्हती ; बड्या नेत्याच्या मुलाने पवारांना पत्रातून केले विधान

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पणजी | शरद पवार यांना देश जबाबदार राजकारणी म्हणून बघतो. त्यांच्या कडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती. अशा आशयाचे पत्र लिहून दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर यांच्या मुलाने शरद पवार यांच्या विधानाबद्दल  दुःख व्यक्त केले आहे.

माझ्या हयात नसणाऱ्या वडिलांबद्दल  खोटी विधाने करून  आपण बोलण्याचे स्वातंत्र्य भोगत आहेत. एका जबाबदार नेत्या कडून देशाला हि अपेक्षा नाही. आपण माझ्या वडिलांच्या संर्दभात  केलेल्या विधानामुळे मला आणि माझ्या परिवाराला तीव्र दुःख झाले  आहे. अशी भावना उत्कल मनोहर पर्रीकर यांनी शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

 

कोल्हापूर येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत शरद पवार यांनी राफेल करारावरून भाजप सरकारवर निशाणा साधला होता. राफेल करार योग्य पद्धतीने केला जात नव्हता. तसेच विमानाच्या किंमती तिन वेळा बदलल्या होत्या. या  सर्व बाबी नपटल्याने पर्रीकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असे शरद पवार म्हणाले होते. पवारांच्या याच विधानावर मनोहर पर्रीकरांच्या मुलाने शरद पवार यांना पत्र लिहून तीव्र  भावना व्यक्त केल्या आहेत.