हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना वाढत असतानाच आयपीएल मधेही बायो बबलला भेदून कोरोनाने शिरकाव केला. अनेक खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्यानंतर अखेर आयपीएल रद्द करण्यात आली. आयपीएल स्पर्धेत २९ सामने झाले आहेत, तर ३१ सामने खेळायचे बाकी आहेत. उर्वरीत आयपीएल सामन्यासाठी भारताला अनेक देशातुन निमंत्रण आले आहे. मात्र बीसीसीआयने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाहीये.
यादरम्यान जर उर्वरीत आयपीएल स्पर्धा रद्द झाली तर तब्बल २००० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागेल असे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याने सांगितले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गांगुलीने हा खुलासा केला आहे.
गांगुली म्हणाला,”अऩेक फेरबदल करावे लागणार आहेत. अऩ्य बोर्डांशीही चर्चा सुरू आहे आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कपपूर्वी उर्वरित आयपीएल खेळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक गोष्टींवर विचार सुरू आहे आणि हळुहळू काम सुरू होईल. पण, जर आम्ही आयपीएलचा दुसरा टप्पा घेण्यास अपयशी ठरतो, तर जवळपास 2500 कोटींचे नुकसान होईल.”
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.