‘ही’ आहेत जगातील सर्वात महाग चॉकलेट्स; किंमत ऐकूनच तुम्हीही थक्क व्हाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या जगामध्ये असे खूप लोक आहेत ज्यांना चॉकलेट (Chocolate) प्रचंड आवडत. फक्त लहान मुलेच नाहीत तर मोठी माणसे देखील चॉकलेटसाठी वेडी असतात. चॉकलेट हे कोणालाही आनंद देऊ शकते. तसेच चॉकलेट खाल्ल्यामुळे आरोग्यासाठी देखील अनेक फायदेशीर लाभ होतात. परंतु या सगळ्यात आपण हा विचार करत नाही की आपण खात असलेल्या मूळ चॉकलेटची खरी किंमत (Chocolate Price) काय असेल? तसेच ते चॉकलेट आपल्याला परवडणारे असेल की नाही. त्यामुळेच आजच्या लेखात आपण चॉकलेटच्या मूळ किमतीविषयी जाणून घेणार आहोत.

सध्या बाजारामध्ये वेगवेगळ्या दुकानात वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट विकली जातात. परंतु या चॉकलेटचा दर्जा तितका चांगला नसतो. या सगळ्या तुम्हाला हे माहीत असायला हवे की, जगातील सर्वात महाग चॉकलेट ‘ले चॉकलेट बॉक्स’ आहे. हे चॉकलेट खूप चांगल्या डिझायनर बॉक्समध्ये देण्यात येते. या बॉक्समध्ये हिऱ्यांचे हार, बांगड्या, नीलमणी, अंगठ्या अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत. यातील चॉकलेट हे त्याच्या सॉफ्ट आणि स्पेशल चवीसाठी प्रसिद्ध आहे.

चॉकलेटच्या किमती किती?

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, या एका बॉक्सची किंमत सुमारे 1.5 दशलक्ष म्हणजेच 10.94 इतकी आहे. याबरोबर
चॉकलेट ट्रफलची किंमत देखील तितकीच महाग आहे. हे चॉकलेट तब्बल 1,89,498 कोटी रुपयांना विकले जाते. फ्रोझन ह्योट या चॉकलेटला बनवण्यासाठी तर 28 प्रकारचे कोको, गोल्ड लीफ आणि La Madeleina Au Truffle वापरण्यात येतात. त्यामुळे याची किंमत 25 हजार डॉलरच्या पुढे आहे.

इतकेच नव्हे तर, जगातील सर्वात महागडा चॉकलेट म्हणून नोका चॉकलेटची ओळख आहे. या चॉकलेटची किंमत 330 डॉलर म्हणजेच 24602.21 रूपये इतकी आहे. तर डेल्फी एडीबल गोल्ड क्रिएशन हे देखील महाग चॉकलेटच्या यादीत आहे. या चॉकलेटची किंमत 397 डॉलर इतकी आहे. या चॉकलेटच्या बॉक्समध्ये फक्त 8 चॉकलेट्स देण्यात येतात. याव्यतिरिक्त चॉकलेटच्या बॉक्समध्ये हिरे, गोल्डन कॉइंस देखील मिळतात.