हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१४ ते २०१६ पर्यंत इबोलाचा उद्रेक झाला. पश्चिम आफ्रिकेत या विषाणूचा संसर्ग झालेल्या सुमारे ९० टक्क्यांहून अधिक लोकांचा बळी गेला. हा इबोला वर्गातील सर्वात प्राणघातक विषाणू मानला जात होता. आता जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये २.४ दशलक्ष लोकांना कोरोना या विषाणूची लागण झालेली आहे.या आजारामुळे जगभरात जवळपास १ लाख ६५ हजार लोक मरण पावले आहेत.तुम्हाला माहिती आहे का,जगातील सर्वात अत्यंत घातक १० रोगकारक विषाणू कोणते आहेत ते तर जाणून घ्या.
Marburg virus याचा शोध १९६७ साली लागला होता.जर्मनीमध्ये एका लॅबमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये हा विषाणू आढळून आला.यातील संसर्गग्रस्त लोक युगांडातुन आणलेल्या माकडांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली.मार्बर्ग विषाणूची लागण झालेल्यांमध्येही इबोला विषाणूसारखीच लक्षणे दिसून येतात जसे की अंतर्गत रक्तस्त्राव, उच्च ताप आणि अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू. हा आजार कॉंगोमध्ये देखील आढळून आलेला,ज्यामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण हे ८०% पेक्षा जास्त होते.
आता माहिती घेऊयात Ebola virus विषयीची. सन १९७६ मध्ये,त्याचे संक्रमण सुदान आणि कॉंगो प्रजासत्ताकमध्ये आढळून आले.शरीरातील फ्लूइड , खोकला, रक्त, श्लेष्मा द्वारे पसरणारा हा विषाणू अत्यंत प्राणघातक आहे. त्याच वेळी, इबोला वर्गातल्या बर्याच व्हायरसचा माणसांवर परिणाम होत नाही.
Rabies विषाणू हा देखील या प्रकारात येतो. कुत्रा, मांजर, डुक्कर यांपासून ते अनेक प्रकारच्या चार पायांच्या प्राण्याच्या चावण्यामुळे हा आजार होण्याची भीती असते.१९२०मध्ये सर्वप्रथम या व्हायरसचा शोध लागला.Boston Universityच्या सूक्ष्मजीवशास्त्रातील प्राध्यापक Elke Muhlberger यांच्या म्हणण्यानुसार, वेळेत उपचार न मिळाल्यास आजपर्यंत आढळलेल्या व्हायरसपैकी हा सर्वात प्राणघातक ठरू शकतो. थेट मेंदूवर परिणाम करणारा हा विषाणू भारत आणि आफ्रिकन देशांमध्ये अजूनही एक मोठी समस्या बनून आहे.
HIV विषाणू देखील या प्राणघातक विषाणूंच्या प्रकारात आहे, ज्यामुळे १९८० पासून ३२ दशलक्षांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, आफ्रिकन देशांमधील प्रत्येक २५ प्रौढांपैकी १व्यक्ती एचआयव्हीने संक्रमित आहे. म्हणजेच, जगातील एक तृतीयांश लोक या विषाणूला बाली पडत आहेत. तथापि, यासाठी अँटी-व्हायरस औषधे देखील आहेत,जर ती घेतली तर आजारी व्यक्ती कित्येक वर्षे सामान्य पणे जीवन जगू शकते.
Hantavirus नावाचा हा प्राणघातक विषाणूचा शोध अमेरिकेत १९९३ मध्ये लागला जेव्हा या संसर्गामुळे काही दिवसातच एका जोडप्याचा मृत्यू झाला.हा विषाणू मानवाकडून मानवांमध्ये पसरत नाही, तर त्याऐवजी संक्रमित उंदीरांच्या संपर्कात येण्याने येतो.जेव्हा आजारी उंदीराच्या ताजी लघवीच्या संपर्कात येण्याने किंवा त्याच्या लाळेला स्पर्श होण्याने याचा संसर्ग होततो.तसेच संक्रमित प्राण्याच्या आसपासच्या हवेतही,हे विषाणू असू शकतात आणि माणसांना देखील हा आजार होऊ शकतो.
Influenza म्हणजे फ्लू हा विषाणू देखील खूप धोकादायक असू शकतो.डब्ल्यूएचओच्या मते,या सामान्य फ्लूच्या हंगामात ५ लाखाहून अधिक मृत्यू होऊ शकतात. स्पॅनिश फ्लू हा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक फ्लू मानला जातो, ज्यामुळे आतापर्यंत ५० दशलक्षांपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
Dengue फीव्हर प्रथम १९५० मध्ये फिलीपिन्स आणि थायलंडमध्ये दर्शविला गेला. आता जगातील जवळजवळ ४०टक्के भागावर याचा परिणाम झालेला आहे. डब्ल्यूएचओच्या मते डासांद्वारे पसरलेल्या या आजाराचा परिणाम वर्षाकाठी ५० ते १०० दशलक्ष लोकांना होतो. जरी यामध्ये मृत्यूचे प्रमाण इतर विषाणूंपेक्षा कमी असले,तरी वेळेवर उपचार न घेतल्यास रुग्ण २० टक्के या प्रकरणात मरण पावू शकतो. त्याची लस सापडली आहे,परंतु त्याची लस ही त्यांनाच दिली जाते की यापूर्वीही ज्यांना डेंग्यूची लागण झालेली आहे.जर तसे झाले नाही तर तीव्र डेंग्यूचा धोका राहून,मृत्यू देखील होऊ शकतो.
Rotavirus देखील सर्वात धोकादायक व्हायरसपैकी एक आहे. नवजात आणि लहान मुलांमध्ये यामुळे तीव्र अतिसार होतो.रोटावायरस ही भारतात मोठी समस्या आहे, विशेषत: ग्रामीण भागात, जेथे स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही. २००८ मध्ये डब्ल्यूएचओच्या मते, जगभरात ४५३०० पेक्षा जास्त मुले या व्हायरसच्या संसर्गामुळे मरण पावली. मात्र, आता त्याची लस आली आहे.
२००३ मध्ये, सार्स (SARS-CoV) दिसू लागला.त्याची उत्पत्ती हि चीनमधून झाली आणि लवकरच त्याचे रुग्ण दोन डझनहून अधिक देशांमध्ये आढळले. यामुळे ७७४ लोक मरण पावले. अद्यापही नक्की कोणत्या प्राण्यापासून सार्स पसरला हे माहित नव्हते, परंतु बरेच वैज्ञानिक मानतात की मांजरीचे मांस खाल्ल्यामुळे ते मानवी शरीरात पोहोचले.यावर कोणतीही लस किंवा निश्चित असे उपचार नाहीत.
त्यानंतर २०१२ मध्ये MERS-CoV आला. याला Middle East respiratory syndrome म्हंटले जाते.सौदी अरेबियामध्ये पसरलेल्या या प्राणघातक आजाराचा स्रोत हे उंट होते.यात मृत्यूचा दर ४०% आहे, जो मानवांपासून प्राण्यांमध्ये सर्वात प्राणघातक असल्याचे मानले जाते.यातून वाचवण्यासाठीसुद्धा, लस अद्यापही तयार केलेली नाही.
यानंतर कोविड -१९ आहे, असा विश्वास आहे की कोविड -१९ हा coronavirus वर्गातील सर्वात नवीन व्हायरस आहे. त्याला SARS-CoV-२ देखील म्हटले जाते. चीनच्या वुहानमधून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आढळून आलेल्या या विषाणूने आता जगातील जवळजवळ प्रत्येक देश पकडला आहे आणि २४ लाखाहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे.त्याच्या अजूनही स्रोताचा कोणताही ठाम असा पुरावा नाही आहे. असे मानले जाते की ते संक्रमित वटवाघूळ किंवा कुत्र्यांमुळे हे मानवांमध्ये पोहोचले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.