व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

LIC Jeevan Anand Policy : रोज 45 रुपयांची बचत करून मिळवा 25 लाखांचा फंड; कसे ते पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवर जर तुम्ही तुमच्या बचतीकडे लक्ष दिले नसेल किंवा अपुऱ्या पगारामुळे अन वाढणाऱ्या महागाईमुळे होणारा खर्च अन त्या खर्चामुळे जर बचतीसाठी पैसे तुमच्या हातात उरत नसतील तर LIC च्या ह्या पॉलिसीच्या माध्यमातून तुम्ही चक्क 25 लाख रुपयांचा मजबूत बँक बॅलेन्स उभा करू शकता. त्यासाठी तुम्ही नियमितपणे एक लहानशी ठराविक रक्कम LIC च्या ह्या पॉलिसीत गुंतवण्याची तयारी ठेवलीत तर हे मुळीच अशक्य नाही. तर वेळ न दवडता आजच LIC च्या ह्या पॉलिसीत फक्त 45 रुपयांची बचत करा आणि मिळवा 25 लाख रुपये.. LIC जीवन आनंद पॉलिसी असं या योजनेचं नाव आहे. यामध्ये तुम्ही दररोज फक्त 45 रुपयांची बचत करून मोठा फंड मिळवू शकता. एवढेच नाही तर पॉलिसी अंतर्गत गुंतवणुकीत तुम्हाला इतर अनेक फायदेही मिळतात.

अश्याप्रकारे तुम्हाला मिळतील 25 लाख रुपये

तुम्ही दररोज 45 रुपयांची बचत करून महिन्याला 1350 रुपये जमा करू शकतात . जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणुकीसाठी देखील तुम्हाला दरमहा रु. 1358 ची आवश्यकता आहे. मात्र, यासाठी तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे तुमची पॉलिसी 35 वर्षात पूर्ण होईल. मॅच्युरिटीवर हे 45 रुपये तुम्हाला 25 लाख रुपयांचा फंड उभा करून देतील देतील. तसेच, तुम्हाला हे पैसे आयुष्याच्या त्या टप्प्यावर मिळतील जेव्हा तुम्हाला पैशांची सर्वात जास्त गरज असते. कारण बर्‍याच नोकऱ्यांमध्ये 60 वर्षांनंतर सेवानिवृत्ती घोषित करण्यात येते म्हणूनच निवृत्तीनंतर सुखी जीवनासाठी 25 लाखांचा निधी बहुमूल्य ठरू शकतो.

पॉलिसीसाठी आवश्यक कागदपत्र

जर तुम्हाला या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक खाते असणे अनिवार्य आहे. ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्ही जवळच्या भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या कार्यालयात जाऊन पॉलिसी अंतर्गत खाते उघडू शकता. तसेच, एलआयसी एजंटद्वारे खाते उघडून गुंतवणूक सुरू करता येते. लक्षात ठेवा, पॉलिसीचा हप्ता कधीही खंडित करू नये. अन्यथा, तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. जीवन आनंद पॉलिसी ही एकमेव पॉलिसी आहे ज्यामध्ये ग्राहकांना दुप्पट बोनसचा लाभ मिळतो.