स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत ‘हे’ पदार्थ; आजपासूनच खायला चालू करा

human memory
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकदा डोक्यात अनेक विचार असल्यामुळे किंवा वाढत्या वयामुळे आपल्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो काही गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत. यापूर्वी हि समस्या वयस्कर लोकांमध्ये दिसत होती. परंतु आता मात्र तरुण लोकांच्या मधेही हे प्रमाण वाढलं आहे. तुम्हाला स्मरणशक्ती वाढवायची असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्याचे सेवन केल्यामुळे तुमची स्मरणशक्ती नक्की वाढेल. चला जाणून घेऊया नेमके हे कोणते पदार्थ आहेत….

१) रोजच्या आहारातील दूध, दही, बदाम अक्रोड किंवा काजू सतत खात राहाल तर तुमची स्मरणशक्ती चांगली राहण्यास मदत होते.

२) तसेच मासे, शेंगा, बीन्स, भोपळ्याच्या बिया, गहू, बार्ली आणि ओट्स इत्यादी मॅग्नेशियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने सुद्धा स्मरणशक्ती वाढते.

३) जर तुम्ही मांसाहारप्रेमी असाल तर आठवड्यातून एक दिवस किंवा 2 दिवस मासे नक्की खा. माशांच्या सेवनामुळे मेंदूला चालना मिळते. माशात ओमेगा-३ फॅटी अॅसिड आढळते, जे मेंदू आणि डोळ्यांसाठी खूपच उपयुक्त आहे.

४) स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कॉफी सुद्धा खूपच उपयुक्त आहे. याचे कारण म्हणजे कॉफीमध्ये कॅफिन असतात ज्याची शरीराला कॅफिनची गरज असते. यामुळे आपली एकाग्रता वाढते. मर्यादित प्रमाणात कॅफिन स्मरणशक्तीसाठी फायदेशीर ठरते .

५) विविध प्रकारच्या बियांचे सेवन केल्याने सुद्धा स्मरणशक्ती वाढण्यास चालना मिळते. बियांमध्ये व्हिटॅमिन ए, के.सी.बी ६, ई-मॅंगनीज, आयर्न, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. या सर्व घटकांमुळे तुमची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी मदत होते.