हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्यामुळे जर तुम्ही 31 जुलै 2022 पर्यंत ITR भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल अशा बातम्या समोर आल्या होत्या. हे खरं असलं तरीही असेही काही खास लोक आहेत जे 31 जुलैनंतरही आयटीआय दाखल करू शकतात आणि त्यांना दंड भरावा लागणार नाही. चला, जाणून घ्या असे कोणते नियम आहेत ज्यांच्या अंतर्गत तुम्ही ३१ जुलैनंतरही ITR दाखल करू शकता?
आयकर तज्ञांचे म्हणणे आहे की आयकराच्या कलम 234F अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीचे आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा कमी असेल, तर ITR उशीरा भरण्यात काही फरक नाही. जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कोणत्याही व्यक्तीने ३१ जुलैनंतर आयकर भरला तर त्याला कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही. परंतु, ते तुम्ही निवडलेल्या कर प्रणालीवर अवलंबून आहे. नवीन कर प्रणाली निवडण्यासाठी सूट मर्यादा 2.5 लाख रुपये आहे. मग त्या व्यक्तीचे वय काहीही असो.
मात्र, जर एखाद्याने जुन्या कर प्रणालीची निवड केली, तर ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांना ही सूट 2.5 लाख रुपये आहे. तसेच, 60 वर्षे किंवा त्याहून अधिक आणि 80 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. याशिवाय, 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी मूळ सूट मर्यादा 5 लाख आहे.