Wednesday, June 7, 2023

या’ कारणांमुळेही येऊ शकते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस, जाणून घ्या नियम

नवी दिल्ली । तुम्ही अ‍ॅनुअल इंफॉर्मेशन स्टेटमेंट (AIS) लाँच करण्यापूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला होता का? जर तुम्ही आर्थिक वर्षात मिळालेल्या काही अत्यावश्यक उत्पन्नाकडे दुर्लक्ष केले असेल तर तुम्हाला तुमच्या टॅक्स रिटर्नवर नोटिस मिळू शकते.

आत्तापर्यंत रिटर्न भरण्यापूर्वी अ‍ॅनुअल टॅक्स स्टेटमेंट किंवा फॉर्म 26AS नमूद करणे आवश्यक होते. अ‍ॅनुअल इंफॉर्मेशन स्टेटमेंट 1 नोव्हेंबर 2021 रोजी लाँच करण्यात आले. हे स्टेटमेंट 26AS पेक्षा जास्त माहिती देते. फॉर्म 26AS मध्ये फक्त हाय व्हॅल्यू ट्रान्सझॅक्शन आणि TDS नमूद केले आहेत तर AIS मध्ये सेव्हिंग बँक इंटरेस्ट, डिव्हीडंड, कॅपिटल गेन आणि शेअर ट्रान्सझॅक्शनचे सर्व डिटेल्स आहेत.

फॉर्म 26AS (NSDL) आणि प्री-फील्ड इन्कम टॅक्स फॉर्म (इनकम टॅक्स डिपार्टमेंट) मधील डेटा जुळत नसल्यामुळे, अनेक करदात्यांना यावर्षी कमी रिफंड मिळाला.

38 वर्षीय कीर्ती मिसाळ वापरत असलेल्या जुन्या खात्यातील बचत बँक खात्यावरील व्याजाचा उल्लेख करण्यास विसरली. ती म्हणाली, “माझ्याकडे त्या खात्याचे पासबुक किंवा ऑनलाइन एक्सेस नव्हता. रिटर्न भरण्याच्या माझ्या घाईत, मी सेव्हिंग इंटरेस्टचा उल्लेख केला नाही.” कीर्तीने ऑक्टोबर 2021 मध्ये तिचे रिटर्न भरले असल्याने, तिला AIS मध्ये एक्सेस नव्हता आणि नोटीसला उत्तर देण्यासाठी तिने चार्टर्ड अकाउंटंटची मदत घेतली आहे.

चार्टर्ड क्लब संस्थापक करण बत्रा म्हणतात, “नुकताच लाँच केलेला AIS हा एक सर्वसमावेशक डॉक्यूमेंट आहे आणि त्यात सेव्हिंग बँक इंटरेस्ट, डिव्हीडंड यासारखी माहिती आहे. सध्याच्या फॉर्म 26AS मध्ये फक्त FD व्याज होते आणि डिव्हीडंड डिटेल्स नसतात. म्हणून, ज्यांच्याकडे पूर्वी AIS ची माहिती नव्हती आणि त्यांनी केवळ फॉर्म 26AS च्या आधारे रिटर्न भरले आणि आता त्यांना नोटिसा मिळत आहेत.”

वास्तविक करपात्र रक्कम आणि रिपोर्ट केलेल्या ट्रान्सझॅक्शनच्या रकमेतील फरकामुळे अनेक नोटिस आल्या आहेत. अहमदाबादचे चार्टर्ड अकाउंटंट राजू शाह म्हणतात, “आम्हाला आमच्या क्लायंटसाठी एडजस्टमेंटसाठी अनेक नोटिसा मिळाल्या आहेत. त्यामध्ये कॅपिटल गेनच्या संदर्भात AIS मध्ये एक्चुअल कॉस्टचा विचार केला गेला आहे. मात्र कॅपिटल गेनखाली एक इन्डेक्स्ड कॉस्ट विचारात घेणे आवश्यक आहे. निव्वळ आणि एकूण करपात्र उत्पन्नातील फरकामुळे 143(1) अंतर्गत इन्कम टॅक्स नोटिस मिळाली आहे.”

जर तुम्हाला ईमेल किंवा पोस्टद्वारे अशी कोणतीही नोटिस मिळाली असल्यास, कृपया नोटीसला प्रतिसाद देण्यासाठी आणि उशीर टाळण्यासाठी टाइमलाइन तपासा. चूक खरी आहे की नाही याचे मूल्यांकन करा किंवा स्वतंत्र गणना विचारात घ्या. जर टॅक्सची मागणी व्हॅलिड असेल तर पुढे जा आणि योग्य प्रक्रियेचे पालन करा. जर तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी किंवा कोणत्याही विसंगतीची तक्रार करायची असल्यास, नवीन इन्कम टॅक्स पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर ऑनलाइन पर्याय उपलब्ध आहे.