“बाळासाहेबांच्या कृपेनेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, मात्र…”; नारायण राणेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. मात्र, आताचे शिवसेना प्रमुख मराठी माणसाच्या मुळावर आहे. आजारपणामुळे ते मंत्रालयात गेले नाहीत. गुणवत्ता पात्रता नसतानाही सव्वा दोन वर्ष काढली, मुख्यमंत्रीपद हे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मिळाले. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून राजकारण केले जात आहे,” अशी टीका राणे यांनी केली.

मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मीही मराठा आहे. त्यामुळे मला राजकारण शिकवू नये. मी कुणाच्या आजारपणावर बोलणार नाही. दुसरा कुणी असता तर राजीनामा दिला असता. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल तर लोककल्याणकारी काम करा.

मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत, कॅबिनेटमध्ये जात नाहीत, सभागृहात जात नाहीत. गुणवत्ता पात्रता नसतानाही सव्वा दोन वर्ष काढली, मुख्यमंत्रीपद हे बाळासाहेंबामुळे मिळाले. आम्हाला त्यांनी घडवलं, आमच्याकडून बघून त्यांना आनंद व्हायचा, असे राणे यांनी म्हंटले.

Leave a Comment