SBI च्या ‘या’ खातेधारकांना फ्री मध्ये मिळत आहेत दोन लाख रुपये, त्याचा कसा फायदा घ्यावा हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कामाची ही बातमी आहे. SBI आपल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत फ्री इन्शुरन्स (Free insurance) देत आहे. वास्तविक, जन धन खात्यांच्या खातेदारांना ही सुविधा बँक देत आहे. SBI रुपे डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा संरक्षण देते. रुपे डेबिट कार्ड वापरणाऱ्यांना मृत्यू विमा, खरेदी संरक्षण कवच आणि इतर फायदे मिळतात. जन धन खातेधारक (Jan Dhan Accounts) फ्री इन्शुरन्स घेऊ शकतात.

ही योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती
पंतप्रधान जन धन योजना (PM Jan Dhan Scheme) वर्ष 2014 मध्ये सुरू केली गेली होती. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणार्‍या पद्धतीने आफायनान्शिअल सर्व्हिस, बँकिंग बचत आणि ठेव खाती, क्रेडिट, विमा, पेंशनची सुविधा मिळवून देते. आपला ग्राहक जाणून घ्या (KYC) ची कागदपत्रे देऊन कोणीही जनधन खाते ऑनलाइन उघडू शकते.

ट्रांसफर करण्याचा एक पर्याय देखील आहे
मूलभूत बचत खाते जन धन योजना खात्यात ट्रांसफर करण्याचा पर्यायही आहे. ज्यांच्याकडे जन धन अकाऊट्स आहेत त्यांना बँकेकडून RuPay PMJDY कार्ड मिळते. 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडलेल्या जन धन खात्यावर जारी करण्यात आलेल्या RuPay PMJDY कार्डांसाठी विम्याची रक्कम 1 लाख रुपये असेल. 28 ऑगस्ट, 2018 नंतर देण्यात आलेल्या RuPay कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती कव्हर बेनिफिट मिळेल.

क्लेम कसा करावा ते शिका?
या योजने अंतर्गत वैयक्तिक अपघात पॉलिसीतही आपण भारताबाहेरील घटनेची माहिती घेऊ शकतो. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर विम्याच्या रक्कमेनुसार क्लेम भारतीय रुपयात भरला जाईल. कोर्टाच्या आदेशानुसार लाभधारक कार्डधारकाच्या खात्यात किंवा कायदेशीर वारसदार होऊ शकतात.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment