किराणा मालाच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला, दुकानातील जीवनावश्यक वस्तूंचा मुद्देमाल गायब

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरजेतील तानाजी चौक, हरीमंदिराजवळ आवटी उद्यानासमोर असलेल्या अमोल अरूण ऐतवडे यांच्या अमोल ट्रेडिंग कंपनी या किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरी झाली असून दुकानातील ६ हजार रूपयांची चिल्लर व दुकानातील साहित्य असा एकूण ६० हजार रूपयांचा मुद्देमाल गायब झाला आहे. ऐतवडे यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली. अमोल ऐतवडे हे रात्रीच्यावेळी दुकानबंद करून घरी गेले. ऐतवडे यांचे घर दुकानाच्या पाठीमागील बाजूस राहतात.

सकाळी सहा ते घराजवळ असलेल्या हरीमंदिरात दर्शन घेवून दुकान उघडण्यासाठी आले. दुकानासमोर साखर सांडलेली दिसली. रात्री ऐतवडे यांनी दुकानासमोरील सर्व कचरा भरून ठेवलेला असताना दुकानाच्या पायरीवर साखर सांडल्याने त्यांना संशय आला. अमोल ऐतवडे यांना दुकानाच्या समोरील शटरचे कुलूप तोडलेले दिसले.दुकानाचे शटर वर उचलून दुकानात गेल्यानंतर त्यांना पैशाचा गल्ला उघडा दिसला. गल्ल्यातील सहा हजार रूपयांची चिल्लर नव्हती.

तसेच साखरेचे तोते, चहा पावडर, शेंगदाणे पंचवीस किलो, दुध चार लिटर, अंड्याचा ट्रे, तांदळाची १७ पोती, मुगडाळ ३० किलोची पोती इतर साहित्य असा एकूण ६० हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. ऐतवडे हे नेहमीच सकाळी लवकर दुकान उघडत असतात. दुकानातील निम्मा मालच गायब झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐतवडे यांनी मिरज शहर पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी परिसरातील पाहणी केली.

You might also like