Home Loan घेण्याचा विचार आहे? मग ‘ही’ बातमी तुमच्या कामाची

home loan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बिझिनेसनामा ऑनलाईन । सध्याच्या डिजिटल युगात आपण सर्वच जण अगदी “करलो दुनिया मुठी में… ” म्हणत एकेक शिखर पायदळी तुडवत यशाच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. पण हे सारे करताना बहुतेक वेळा आपण आपले “अंथरूण पाहूनच पाय पसरावे ” असे थोरा मोठ्यांचे अनुभवाचे बोल नेहमीच कानावर पडतात ज्याकडे कानाडोळा केल्यास कदाचित आपल्यावर एखादे आर्थिक संकट ओढावू शकते कारण आजकाल आपण आपल्याला हवी असलेली प्रत्येक वस्तू हि खिश्यात पैसे नसतानाही क्रेडिट कार्डने मागवू शकतो ते हि फक्त एका क्लीकवर . शिवाय आजच्या स्थितीत अश्या बऱ्याच फायनान्स कंपन्या बाजारात अगदी कमी कागदपत्रांची पडताळणी करून झटपट कर्ज देण्याची आमिष दाखवून अनेकांना कर्जाच्या बोज्याखाली ओढत आहेत. तसेच कर्ज आता EMI च्या स्वरूपात फेडण्याची सोय फायनान्स कंपन्यांनी केल्याने बऱ्याच जणांची ते घेण्यासाठी चढाओढ सुरु असल्याचे पाहण्यास येत आहे. आजच्या घडीला TV ,GAS,फर्निचर इतकेच काय ? तर एखादे घर देखील कर्जाने आपण खरेदी करू शकतो. पण तत्पूर्वी ते घेताना ” किती? पगारावर तुम्ही किती ? रुपयांचे कर्ज घेतले पाहिजे हे जर जाणले तर तुमच्या पगारातील पैशांचे योग्य नियोजन करणे सोपे जाईल. इथे आम्ही सरळ आणि साध्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पगारावर किती रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता हे सांगत आहोत.

HOME LOAN FACTOR

तुम्हाला तुमच्या पगारानुसार कर्ज मिळू शकते, म्हणजे जेव्हढा तुमचा पगार अधिक तेव्हढी तुम्हाला मिळणारी कर्जाची रक्कम हि अधिक असेल. बँकेकडून मिळणारी कर्जाच्या रक्कमेची तुलना करून तुम्ही स्वतःसुद्धा अधिकाधिक रक्कमेचे कर्ज घेऊ शकता..

किती रुपयांच्या पगारावर किती कर्ज मिळू शकते?

नुकतेच आरबीआयने सहाव्यांदा रेपो रेट वाढवला असल्याने तज्ज्ञांच्या मते तुम्ही तेव्हढेच कर्ज घ्या जेव्हढ्या कर्जाची तुम्हाला गरज आहे. मग भले तुमचा पगार कितीही ? असला तरी चालेल. वार्षिक १० लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या पगारदारांना जास्तीत जास्त ६० लाख रुपयांपर्यंत गृह कर्ज मिळू शकते. तिथेच वार्षिक १५ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या सेल्फ कर्मचाऱ्यांसाठी ४५ लाखांपर्यंत गृह कर्ज मिळू शकते.

गृह कर्ज घेताना वयाचेही भान ठेवणे अनिवार्य आहे

गृह कर्ज घेताना वयाची भूमिका लक्षात घेणे महत्वाचे आहे. जर तुम्ही कमी वयात कमावताना कर्ज घेत असाल तर बँकांचा तुमच्यावर अधिक विश्वास बसेल तसेच तुमचा अर्जही लवकर अप्रूव्ह होईल पण जर तुमचे वय अधिक असेल तर तुम्हाला मिळणारी गृह कर्जाची रक्कम हि कमी असेल तसेच ती फेडण्याचा कालावधी देखील तुम्हाला कमी मिळेल … जे समजून घेण्यासाठी तुम्ही खालील माहितीचा वापर करू शकता…

35 वय वर्षासाठी 30 वर्षाची कर्ज फेडण्याची मुदत मिळू शकते
40 वय वर्षासाठी 25-30 वर्षाची कर्ज फेडण्याची मुदत मिळू शकते
45 वय वर्षासाठी-25 वर्षाची कर्ज फेडण्याची मुदत मिळू शकते
50 वय वर्षासाठी 15 ते 20 वर्षाची कर्ज फेडण्याची मुदत मिळू शकते