मुलीने प्रेम विवाह केला म्हणून जन्मदात्यानेच पेपर कटरनं मुलीचा गळा कापला

0
85
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तामिळनाडू : वृत्तसंस्था – तामिळनाडूच्या थिरुप्पुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका बापानं आपल्याच पोटच्या पोरीचा पेपर कटरनं गळा कापण्याचा प्रयत्न केला आहे. दैव बलवत्तर म्हणून मुलीचा जीव वाचला आहे. मुलीनं प्रेम विवाह केला म्हणून वडील नाराज होते. याचाच राग आल्यामुळे या निर्दयी बापाने पेपर कटरच्या सहाय्यानं मुलीचा गळा कापण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुलगी जखमी झाली आहे.

आरोपी बाप हा चित्रकार असून गेल्या १५ वर्षांपासून ते चित्रकाराचं काम करत आहे. त्यांची १९ वर्षीय मुलगी प्रियांका हिनं २५ वर्षीय मोहम्मद यासीन याच्यासोबत प्रेम विवाह केला. या दोघांची एका गार्मेंट फॅक्ट्रीमध्ये ओळख झाली होती. याच ओळखीचं पुढे प्रेमात रूपांतर झाले. हे दोघेही मागच्या चार वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. या दोघांच्या नात्याबाबत प्रियांकाच्या वडिलांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोघांनाही संबंध तोडून टाकण्याचा इशारा दिला होता. यानंतर वडिलांनी प्रियांकाला बहिणीच्या घरी सोडलं होतं. याच दरम्यान प्रियांका आणि यासीन यांनी १६ जुलै रोजी पळून जाऊन लग्न केलं आणि ती यासीनसोबत त्याच्या घरी राहू लागली.

शनिवारी प्रियांका एकटीच घरी होती. यावेळी दारूच्या नशेत असलेले तिचे वडील तिच्या घरात शिरले आणि त्यांनी स्वत:च्या मुलीवरच हल्ला चढवला. एक पेपर कटर हातात घेऊन त्यांनी प्रियांकाच्या गळ्यावर वार केला आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. प्रियांकानं आरडाओरड केल्यामुळे शेजारी तात्काळ घरी आले आणि घडलेला प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला. यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने प्रियंकाला रुग्णालयात दाखल केले आणि तिचा जीव वाचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here