आता पैसे जमा करण्यासाठी ‘ही’ बँक तुमच्याकडून घेणार चार्ज, 1 जानेवारीपासून लागू होणार नियम

Banking Rules
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । तुम्ही जर इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. 1 जानेवारी 2022 पासून, या बँकेच्या खातेदाराला एका मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढणे आणि जमा करणे यासाठी शुल्क भरावे लागेल. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बेसिक सेव्हिंग खात्यातून दर महिन्याला 4 वेळा पैसे काढणे मोफत आहे, मात्र त्यानंतर, प्रत्येक पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी, ग्राहकांना किमान 25 रुपये जास्त भरावे लागतील.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये, तुम्ही एका महिन्यात बचत आणि चालू खात्यांमध्ये शुल्काशिवाय फक्त 10,000 रुपये जमा करू शकता. IPPB ने आपल्या वेबसाइटवर माहिती दिली आहे की, या 10,000 रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.

किमान शुल्क 25 रुपये
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 3 प्रकारची खाती उघडली जातात, ज्यामध्ये बेसिक सेव्हिंग अकाउंट, सेव्हिंग अकाउंटसाठी वेगवेगळे नियम आहेत. ज्या ग्राहकांचे बँकेत बेसिक सेव्हिंग अकाउंट आहे ते दर महिन्याला त्यांच्या खात्यातून कोणत्याही शुल्काशिवाय 4 वेळा पैसे काढू शकतात, मात्र त्यानंतर, ग्राहकांना 0.50 टक्के शुल्क भरावे लागेल, जे किमान 25 रुपये असेल. 1 जानेवारीपासून मर्यादेची मुदत संपल्यानंतर पैसे काढणे आणि जमा करणे यासाठी शुल्क आकारले जाईल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

कॅश पैसे काढण्याचे शुल्क
बेसिक सेव्हिंग अकाउंटशिवाय, इतर बचत खाते आणि चालू खात्यात 10 हजार रुपये जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. यानंतर, 0.50 टक्के शुल्क भरावे लागेल, जे किमान 25 रुपये असेल.

बचत खाते (बेसिक नाही) आणि चालू खात्यातून दरमहा 25,000 रुपये कॅश काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यानंतर, 0.50 टक्के शुल्क भरावे लागेल, जे किमान 25 रुपये असेल.