कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त आहेत ‘ही’ उपकरणे; ते सुद्धा अगदी कमी किमतीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात आणि जगभरात कोविड-19 चे रुग्ण वाढतच आहेत. या वाढत्या प्रकरणांमुळे लोकांच्या मनात दुसऱ्या लाटेच्या भयानक दृश्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचाही तुटवडा जाणवला.

म्हणूनच आता काळाची गरज आहे की आपल्या घरात असे काही गॅजेट्स असायला हवेत जे आपण आपत्कालीन परिस्थितीत वापरू शकू. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही गॅजेट्सबद्दल माहिती देत आहोत जे केवळ स्वस्तच नाहीत तर बाजारातही अगदी सहजरित्या उपलब्ध आहेत आणि ते वापरण्‍यासही सोपे आहेत.

पल्स ऑक्सिमीटर

पल्स ऑक्सिमीटर हे कोविड-19 च्या तपासणीतील एक अतिशय महत्त्वाचे गॅजेट आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी थोड्या थोड्या अंतराने तपासावी लागते. ऑक्सिजनची पातळी कमी होणे हे धोकादायक ठरू शकते. हे उपकरण हाताच्या बोटावर ठेवून तुम्ही पल्स रेट जाणून घेऊ शकता. हे तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त आहे. म्हणूनच ते घरात असलेच पाहिजे. पल्स ऑक्सिमीटर बाजारातही अगदी सहज उपलब्ध आहे. त्याची किंमत 500 रुपयांपासून सुरू होते.

ग्लुकोमीटर
हे गॅजेट रक्तातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते. शुगर असलेल्या रुग्णांसाठी कोरोना अत्यंत जीवघेणा आहे. म्हणूनच कोरोनाच्या या काळात हे गॅजेट घरी असणे अत्यंत गरजेचे आहे. घरात कोणाच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाली किंवा वाढली तर घरीच तपासणी करून तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणे टाळू शकता. एक चांगला ग्लुकोमीटर 800 रुपयांमध्ये येतो.

कॉन्टॅक्टलेस थर्मामीटर
शरीराचे तापमान हे कॉन्टॅक्टलेस थर्मामीटर कोरोनाच्या तपासणीत एक अतिशय महत्त्वाचे गॅजेट आहे. याच्या मदतीने तुम्ही एखाद्याच्या शरीराला स्पर्श न करताही त्याचे तापमान मोजू शकता. घरातील कोणीतरी कोरोनाच्या विळख्यात असताना हे फक्त मदतच करत नाही, तर सावधगिरीच्या वापरासाठी देखील ते अत्यन्त प्रभावी आहे. एक चांगला थर्मामीटर हजार रुपयांपर्यंत मिळतो.

रॅपिड अँटीजन टेस्ट किट 
हे गॅजेट कोरोनाविरुद्धच्या युद्धासाठी अत्यंत प्रभावी आहे. याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी कोरोनाची रॅपिड अँटीजन टेस्ट करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यामध्ये कोरोनाची काही लक्षणे आहेत आणि तुम्हाला किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हॉस्पिटलमध्ये जायचे नसेल, तर घरी प्राथमिक चाचणी म्हणून हा एक चांगला पर्याय आहे. हे किट बाजारात 250 ते 300 रुपयांना मिळते.

नेब्युलायझर मशीन
हे मशीन मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ते ऑनलाइनही ऑर्डर करू शकता. रुग्णाला ऑक्सिजन देण्यासाठी नेब्युलायझर मशीनचा वापर केला जातो. ते थेट फुफ्फुसात ऑक्सिजन पोहोचवते.

Leave a Comment