नवी दिल्ली । Covid Guidelines : कोविड महामारीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आता रद्द केल्या जात आहेत. या सवलती 8 नोव्हेंबरपासून संपत आहेत. आता सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात पूर्णवेळ हजेरी नोंदवावी लागणार आहे. हजेरी नोंदवण्यासाठी Biometric Attendance System उद्यापासून पूर्ववत करण्यात येत आहे.
Biometric Attendance बाबत सर्व केंद्रीय कार्यालयांमध्ये अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भारत सरकारचे उपसचिव उमेश कुमार भाटिया यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे आणि कामाचे तास कमी करणे यासारख्या सवलती आधीच रद्द करण्यात आल्या आहेत. आता 8 नोव्हेंबरपासून प्रत्येक कर्मचाऱ्याला Biometric Attendance नोंदवावे लागणार आहे.
केंद्र सरकारने यासाठी संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वानुसार Biometric Machine जवळ सॅनिटायझर ठेवणे आवश्यक असेल. सर्व कर्मचारी हजेरी नोंदवण्यापूर्वी आणि नंतर सॅनिटायझरने हात स्वच्छ करतील. Biometric Attendance नोंदवताना कर्मचाऱ्यांना आपापसात सहा फुटांचे अंतर राखावे लागेल. सर्व कर्मचार्यांना नेहमी मास्क घालणे किंवा त्यांचा चेहरा झाकणे आवश्यक असेल.
Biometric Machine चे टचपॅड वारंवार स्वच्छ करण्यासाठी नियुक्त कर्मचारी तैनात केले पाहिजेत. हे कर्मचारी हजेरी नोंदवण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविड फ्रेंडली वर्तन राखण्यासाठी मार्गदर्शनही करतील. Biometric मशीन मोकळ्या वातावरणात ठेवावी. जर मशीन आत असेल तर तेथे पुरेसे नैसर्गिक वायुवीजन असावे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरी DA आता 31 टक्के झाला आहे. वाढीव भत्ता 1 जुलै 2021 पासून लागू होईल.