‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता; तुमचे नाव तर यादीत नाही ना?

PM Kisan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना लक्षात घेऊन सुरू केली होती. या योजनेअंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. शेतकऱ्यांच्या खात्यात दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये जमा होतात.

आतापर्यंत 10 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हप्ता येऊ शकतो. त्याआधी हा हप्ता मिळेल का ते तपासा? कारण काही शेतकऱ्यांना 11 वा हप्ता मिळणार नाही.

अकराव्या हप्त्याचे पैसे कधी येणार
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला.

11 वा हप्ता एप्रिलच्या सुरुवातीला येईल
पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान पहिल्या हप्त्याची रक्कम दिली जाते. त्याच वेळी, दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान हस्तांतरित केले जातात. याशिवाय तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान ट्रान्सफर केले जातात. त्यानुसार एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात 11 व्या हप्त्याचे पैसे जमा करता येणार आहेत.

‘या’ शेतकऱ्यांना 11 वा हप्ता मिळणार नाही
शेतकरी कुटुंबातील कोणत्याही सदस्य म्हणजे पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले जर टॅक्स भरत असेल तर त्याला योजनेचा लाभ दिला जात नाही.
ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन नाही त्यांना पीएम किसान योजनेतून वगळण्यात आले आहे.
जर तुमच्या आजोबा किंवा वडिलांच्या नावावर किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर शेतजमीन असेल तर तुम्हाला पीएम किसानचा लाभ मिळणार नाही.
जर एखादा शेतीमालक सरकारी नोकरीत असेल तर त्याला पीएम किसानचा लाभ मिळणार नाही.
रजिस्टर्ड डॉक्टर, इंजिनीअर, वकील, सीए यांनाही या योजनेतून बाहेर ठेवण्यात आले आहे.
जर एखाद्या शेतकऱ्याला वार्षिक 10,000 रुपये पेन्शन मिळत असेल तर तो या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.