हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD हा गुंतवणुकीचा सर्वांत लोकप्रिय प्रकार आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने फिक्स्ड डिपॉझिट (FD) सर्वांत सुरक्षित देखील मानली जाते. त्यातच आता अनेक बँकांनी आपल्या FD चे दर वाढवण्याची घोषणा देखील केली आहे. यामध्येच आता बजाज फायनान्स या कंपनीच्या नावाचा देखील समावेश झाला आहे. बजाज फायनान्स नेही आपल्या FD च्या दरात वाढ केली आहे.
बजाज फायनान्सने आपल्या सर्व प्रकारच्या डिपॉझिट्स वरील व्याज दरात 60 बेसिस पॉंइट्सने वाढ केल्याची घोषणा केली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.25 बेसिस पॉंइट्सचा लाभही देण्यात येणार आहे. हे सर्व नवीन दर 25 एप्रिल पासून लागू करण्यात आले आहेत.
FD चा कालावधी व्याज दर
22 महीने 6.25%
44 महीने 7.1%
24-35 महीने 6.4%
36-60 महीने 6.9%
या मुदतीच्या डिपॉझिट्सवर आता ज्येष्ठ नागरिकांना अनुक्रमे 7.15% आणि 7.35% व्याज मिळेल. सार्वजनिक आणि खाजगी बँकांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील सर्वात मोठी बँक SBI सध्या FD वर सर्वाधिक 6.3 टक्के व्याज देत आहे. हे व्याज ज्येष्ठ नागरिकांना दिले जात आहे.