क्रिप्टोकरन्सीबाबत हर्ष गोएंका यांनी शेअर केलेला ‘हा’ मजेदार व्हिडिओ होतोय व्हायरल, तुम्ही पण पहा

नवी दिल्ली । उद्योगपती हर्ष गोयंका हे त्यांच्या गमतीदार ट्विटसाठी ओळखले जातात. सध्या क्रिप्टोकरन्सी खूप चर्चेत आहे, भारतात क्रिप्टो रेग्युलेशनबाबत साशंकता आहे, अशा परिस्थितीत हर्ष गोयंका यांनी क्रिप्टोबाबत केलेले ट्विट जोरदार व्हायरल होत आहे.

वास्तविक, RPG ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी भारतात क्रिप्टोकरन्सीच्या विक्रीबद्दल आणि त्यामागील कारणाबद्दल त्यांचे मत शेअर केले. व्यावसायिकाने त्यांच्या ट्विटला शीर्षक दिले आहे “भारतात क्रिप्टोची विक्री….” त्यासोबतच एक व्हिडिओ देखील जोडला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही एक बस कंडक्टर ‘क्रिप्टो..क्रिप्टो घ्या’ असे म्हणत तिकीट कापताना पाहू शकता.

येथे व्हिडिओ पहा

 

या व्हिडिओमध्ये पुढे असे दिसते की, एक ग्राहक बस कंडक्टरला बिटकॉइन, शिबा इनू आणि इतर क्रिप्टोकरन्सीची किंमत विचारतो. त्यापैकी एक कंडक्टरशी भांडतो आणि म्हणतो की, तो खरेदी करतो ती करन्सी चालत नाही. त्यानंतर कंडक्टर पुन्हा उत्तर देतो आणि म्हणतो.. “तुम्ही त्यांना विकून टाका… ”

मात्र, देशातील क्रिप्टोची विक्री आणि उन्मादाचा पॉटशॉट घेणारे गोयंका पहिलेच नाही तर याआधीही हेलिओस कॅपिटलचे संस्थापक आणि मार्केट गुरू समीर अरोरा यांनी टीका केली आहे.

क्रिप्टोकरन्सीवर बंदी येईल का?
केंद्र सरकार हिवाळ्यात क्रिप्टोकरन्सीचे रेग्युलेशन करण्यासाठी विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. ही बातमी आल्यापासून, लोकं असा अंदाज लावत आहेत की, सरकार क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. या बातम्यांमुळे बिटकॉइनची किंमत एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर आली आहे. सरकारच्या या निर्णयाचा काय परिणाम होईल याचा अंदाज बाजार आणि तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, सरकार ज्या प्रकारच्या रेग्युलेशनबाबत बोलत आहे त्यावरून असे दिसते ते क्रिप्टोकरन्सीवर पूर्णपणे बंदी घालणार नाही.

सूत्राने सांगितले की, “रेग्युलेशन सिस्टीम निश्चित केल्यानंतर, क्रिप्टोकरन्सीचा कोणताही गैरवापर होणार नाही. हवाला किंवा दहशतवादी फ़ंडींगसाठी क्रिप्टोचा वापर केला जाऊ नये याची सरकारला काळजी आहे.

हिवाळी अधिवेशनात निर्णय होऊ शकतो
The Cryptocurrency and Regulation of Official Digital Currency Bill, 2021 हे हिवाळी अधिवेशनात संसदेत सादर करण्यात येणाऱ्या 26 विधेयकांपैकी एक आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

You might also like