नवी दिल्ली । जर तुम्ही नवीन नोकरी जॉईन केली असेल तर तुमच्या PF चे पैसे नवीन ठिकाणी ट्रान्सफर करणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे. जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य असाल तर तुम्ही PF ऑनलाइन ट्रान्सफर करू शकता. नोकरी बदलताना, तुम्हाला तुमच्या जुन्या EPF खात्यातील पैसे नवीन कंपनीच्या EPF खात्यात ट्रान्सफर करावे लागतील जेणेकरून तुम्हाला PF च्या एकूण रकमेवर अधिक व्याज मिळू शकेल. तुम्ही तुमचा PF कसा ट्रान्सफर करू शकता.
तुम्ही घरबसल्या PF चे पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करू शकता
>> सर्वप्रथम UAN नंबर आणि पासवर्ड वापरून EPFO च्या वेबसाइटवर लॉग इन करा.
>> EPFO वेबसाइटवर ऑनलाइन सर्व्हिसवर जा आणि एक सदस्य एक EPF खाते निवडा.
>> येथे पुन्हा तुमचा UAN नंबर टाका किंवा तुमचा जुना EPF सदस्य आयडी टाका. हे तुम्हाला तुमच्या खात्याची सर्व माहिती देईल.
>> येथे ट्रान्सफर व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुमची जुनी किंवा नवीन कंपनी निवडा.
>> आता जुने खाते सिलेक्ट आणि OTP जनरेट करा.
>> OTP टाकल्यावर मनी ट्रान्सफरचा पर्याय सुरू होईल.
>> तुम्ही ट्रॅक क्लेम स्टेटस मेन्युमध्ये ऑनलाइन स्थिती पाहण्यास सक्षम असाल.
नवीन कंपनीत जमा करावयाची कागदपत्रे
ऑनलाइन PF ट्रान्सफर अर्जाची सेल्फ अटेस्टेड कॉपी PDF फाइलमध्ये निवडलेल्या कंपनीला किंवा संस्थेला ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यापासून 10 दिवसांच्या आत सबमिट करा. त्यानंतर कंपनी त्याला मान्यता देईल. मंजुरी मिळाल्यानंतर, PF सध्याच्या कंपनीच्या नवीन PF खात्यात ट्रान्सफर केला जातो.