पुणे : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील काही उद्योग हे गुजरातला स्थलांतरित झाले. त्यावरून विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणात आक्र्मक झाला आहे. या सगळ्या घडामोडींवरून रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
गुजरातची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातले मोठे उद्योग गुजरातला नेले जात आहेत. याचं खापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर फुटत आहे. याचा विचार व्हावा. महाराष्ट्र कमी पडतोय असं नाही. गुजरात जास्त पुढे पळतोय. हे प्रकल्प इथं आले असते तर रोजगार उपलब्ध झाले असते. छोटे मोठे उद्योग उभे राहिले असते, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. गुजरात निवडणूक जिंकावी म्हणून हा प्रकल्प तिकडे नेला जातोय का, असा सवालदेखील रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच ओल्या दुष्काळावर बोलताना रोहित पवार म्हणाले, मागच्या वर्षी पेक्षा 116 टक्के पाऊस जास्त झालाय. मविआच सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं पत्र लिहिलं होतं. आता का ओला दुष्काळ जाहीर करत नाही, हे राजकारण नाही का, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच काही लोकांना पुढं करायचं त्यांचं नाव खराब करायचं, ही भाजपची पद्धत आहे, अशी जोरदार टीका रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यावेळी केली.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!