कोरोनामुक्त दिवाळी साजरी करता यावी हीच गणेशा चरणी प्रार्थना : खासदार श्रीनिवास पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

गणेशाच्या आगमनाने महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण असते. परंतु गेल्या काही दिवसात कोकण, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मोठी संकटे आलेली आहेत. पुणे, मुंबई, कोकण व सातारा या सर्व ठिकाणी गणेशाच्या मोठ्या मिरवणुका निघत असतात. परंतु काही दिवसात झालेला पाऊस, महापूर, भूस्खलन त्याचबरोबर कोरोना संकटे आलेली आहेत. तेव्हा मी गणेशाच्या चरणी येणारी दिवाळी कोरोनामुक्त दिवाळी साजरी करता यावी, अशी प्रार्थना खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.

सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या कराड (गोटे) येथील निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. याठिकाणी खासदार यांच्या कुटुंबातील सदस्यांनी गणेशाची आरतीही केली. या वेळी त्यांचे चिरंजीव सारंग पाटील पत्नी, सून, नातू व नात हे उपस्थित होते.

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, लोक अनेक संकटात सापडलेले आहेत. अशा लोकांना तरुण मंडळांनी, तरुणांनी मदत करावी. आपल्या जवळच्या लोकांची काळजी घेण्यासाठी शासनाने सध्या काही नियम, बंधने घालून दिली आहेत. तेव्हा कोरोना काळात योग्य पद्धतीने या नियमांचे पालन करावे, जेणेकरून येणारा हा सण आपल्याला उत्साहात साजरा करता येईल. दिवाळीमध्ये सर्व गोरगरीब लोकांना गोड धोड खाता येईल, अशा पद्धतीने कोरोनामुक्त दिवाळी साजरी करता यावी एवढीच प्रार्थना गणेशाचे चरणी करतो.