हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या जागतिक शेअर बाजारात मंदीचे वातावरण आहे. ज्यामुळे गेल्या काही दिवस भारतीय शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार होत आहेत. गेल्या एका महिन्यात निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जवळपास 5 टक्क्यांनी घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. तसेच, यापुढेही बाजारात अशीच नरमाई कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, बाजाराच्या या कमकुवत परिस्थितीतही असे काही शेअर्स आहेत जे प्रचंड तेजीत आहेत. या शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न देखील मिळवून दिला आहे.
सोनल मर्कंटाइल लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सने देखील गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना साडेतीन पट नफा मिळवून दिला आहे. त्याचबरोबर, गेल्या साडेसात वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 2,700 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. 11 ऑक्टोबर रोजी बाजार बंद होण्यापूर्वी या शेअर्सनी 5 टक्क्यांच्या वाढीसह 162.10 रुपयांच्या नवीन सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. हे लक्षात घ्या कि, गेल्या 17 दिवसांपासून यामध्ये अप्पर सर्किट लागल्याचे दिसूल आले आहे. या कारणांमुळेच या शेअर्सची फक्त एका महिन्यातच गुंतवणूकदारांना 251 टक्के इतका मोठा रिटर्न मिळवून दिला आहे. Multibagger Stock
अशा प्रकारे हे शेअर्स बनले मल्टीबॅगर
9 फेब्रुवारी 2015 रोजी शेअर बाजारात पहिल्यांदाच या कंपनीने ट्रेडिंग सुरू केले. त्यावेळी फक्त 5.75 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 162.10 रुपयांच्या पातळीवर आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून सोनल मर्कंटाइल लिमिटेडच्या शेअर्समध्ये जवळपास 277 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 455% रिटर्न मिळवून दिला आहे. तसेचगेल्या साडेसात वर्षात त्याने गुंतवणूकदारांना 2,719.13 टक्के इतका मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
गुंतवणूकदार झाले मालामाल
जर एखाद्याने सोनल मर्कंटाइल लिमिटेडमध्ये एक महिन्यापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज त्याचे मूल्य 250 टक्क्यांनी वाढून 3.5 लाख झाले असेल. तसेच, जर एखाद्याने वर्षभरापूर्वी त्यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याचे मूल्य सुमारे 455 टक्क्यांनी वाढून 5.55 लाख रुपये झाले असतील. त्याच वेळी, जर एखाद्याने 9 फेब्रुवारी 2015 रोजी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे मूल्य 2,719.13 टक्क्यांनी वाढून 28.19 लाख रुपये झाले असते. Multibagger Stock
कंपनीविषयी जाणून घ्या
सोनल मर्कंटाइल लिमिटेड या कंपनीचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत 44.04 लाख रुपये इतका घसरला आहे, जो मागील तिमाहीत 6.08 कोटी रुपये होता. त्याच वेळी, कंपनीचे एकूण उत्पन्न जूनच्या तिमाहीत 19.53 कोटी रुपयांवर घसरले, जे मागील तिमाहीत 27.50 कोटी रुपये होते. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.sonalmercantile.in/
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा