Monday, February 6, 2023

.. म्हणून यंदाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा विचार

- Advertisement -

मुंबई । राज्यावरील कोरोना महामारीचे संकट अजूनही टळलेलं नाही आहे. या पार्श्वभूमीवर यंदा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा विचार सुरू आहे. याबाबत नागपूर इथली तयारी कितपत आहे याचा आज आढावा घेतला जाणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा आग्रह वाढू लागला आहे.

नागपूरला अधिवेशन घ्यायचे ठरल्यास सगळा शासकीय लवाजमा मुंबई आणि इतर जिल्ह्यातून नागपूरला हलवावा लागतो. कोरानाचे नियम पाळत इतक्या लोकांची राहण्याची सोय कशी करायची? हासुद्धा मोठा प्रश्न आहे. तर नागपूरचे आमदार निवास कोविड सेंटर म्हणून वापरात होते. त्यामुळे आमदार निवासात रहायला आमदारांचाही विरोध वाढू लागलाय.

- Advertisement -

दरम्यान, कोरोनापासून बचावाची सर्व दक्षता घेत विधिमंडळाचे २ दिवसीय अधिवेशन बोलावले गेले होते. यावेळी प्रत्येक सदस्याला कोरोना चाचणी करणे बंधनकाराक होते. याशिवाय सभागृहात इतरही खबरदारी घेत मोजक्याचं माणसांना विधिमंडळाच्या कामकाजावेळी प्रवेश देण्यात आला होता.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in