पुण्यातून बाहेर फिरायला जाणाऱ्यांना क्वारंटाईन केले जाणार : अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. अशात प्रशासनाकडून कोरोना रुग्ण वाढणाऱ्या शहरात कठोर निर्बंध लादले जात आहेत. राज्यातील महत्वाचे शहर असलेल्या पुण्यातील कोरोना परिस्थितीचा शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. त्यांनी पुण्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेत महत्वपूर्ण घोषणा केली आहे. “पुण्यात शनिवार व रविवारी दोन दिवशी विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला असून याबाबतचा निर्णय अधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातून बाहेर फिरायला जाणाऱ्यांना पुन्हा आल्यास क्वारंटाईन केले जाणार,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पुण्यात वाढत असलेल्या कोरोना परिस्थितीमुळे या ठिकाणी शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व काही बंद ठेवली जातील. पुण्यात नागरिकांची वाढती गर्दी पाहता प्रशासनाने निर्णय घेतला आहे. शनिवार व रविवार या दोन दिवशी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन सुरु केले आहे.

अजित पवार म्हणाले, “सध्या कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. कोरोनाबरोबर येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा आता लहान मुलांनाही धोका निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत आता बालरोगतज्ञांना या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी विशेष प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. पुण्यात शनिवार व रविवार या दोन दिवशी कठोर निर्बंध लादण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना आता आवाहन करतोय कि, त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अत्यावश्यक कामांव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये”.

Leave a Comment