विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दिराने वहिनीसोबत केले ‘हे’ कृत्य

0
123
rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा : हॅलो महाराष्ट्र – सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीर आणि वहिनीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये दिराने अश्लील फोटोज व्हायरल करण्याची धमकी देत, आपल्या वहिनीवरच अत्याचार केला आहे. या नराधम आरोपीने अनेकवेळा अत्याचार केले आहेत. यानंतर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी बोरगाव पोलिसांनी आरोपी दिराविरोधात बलात्कारासह ब्लॅकमेल आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.

हि पीडित महिला सातारा जिल्ह्यातील एका गावात आपल्या पतीसोबत राहते. तिला एक मुलगा देखील आहे. 3 ऑक्टोबर रोजी पीडित महिलेचा चुलत दीर पीडितेच्या घरी आला होता. यावेळी घरात कोणीही नव्हतं. या संधीचा फायदा घेऊन आरोपीनं पीडितेला बँकेत नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं. तसेच जवळीक साधून आरोपीनं आपल्या वहिनीवरच बलात्कार केला. हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित महिलेचे नग्नावस्थेतील अनेक फोटो देखील काढले. या प्रकारानंतर आरोपीने या घटनेची कुठे वाच्यता केली तर पीडितेला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. यामुळे पीडित महिलेनं संबंधित घटनेची माहिती कोणालाही दिली नाही. यानंतर आरोपीने संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा वाहिनीवर अत्याचार केले.

यानंतर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं अखेर या प्रकाराची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. यानंतर कुटुंबीयांनी बोरगाव पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी दिराविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीवर बलात्कार, ब्लॅकमेल आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी दिराला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here