हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी इंडिया आघाडी (India Alliance) सोडण्याचा निर्णय घेत भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. या पार्श्वभूमीवरच नितेश कुमार यांना उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. “भाजपची साथ सोडा अन्यथा तुम्हाला बॉम्बने उडवून देऊ” अशी धमकी नितेश कुमार यांना आली आहे. हा धमकीचा मेसेज बिहारचे पोलीस महासंचालकांना करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी मेसेज करणाऱ्या व्यक्तीला देखील ताब्यात घेतले आहे.
गेल्या 30 जानेवारी रोजी बिहारचे पोलीस महासंचालक आरएस भट्टी यांच्या व्हाट्सअपवर एका अज्ञात व्यक्तीने मेसेज आणि ऑडिओ क्लिप पाठवली होती. या मेसेजमध्ये म्हटले होते की, “जर मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपपासून वेगळे झाले नाहीत तर इतर आमदारांसोबत त्यांना बॉम्बनं उडवून देऊ, जसे उत्तर प्रदेशात झालं होतं” या काय मेसेज मुळे सर्वत्र खळबळ माजली होती.
तसेच या धमकीची दखल आर्थिक घोटाळा विभागाने घेतली. विभागाने लगेच कर्नाटकमध्ये छापीमारी केली आणि संबंधित आरोपीला अटक केली. या आरोपीला पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले आहे. सोनू असे या आरोपीचे नाव असून तो बीएनएम हायटेक अॅग्रो इंडस्ट्रीज राइस मिलमध्ये काम करत आहे. सोनूने कबूल केले आहे की त्यानेच हा धमकीचा मेसेज पाठवला होता. बिहारमध्ये वाढत्या बेरोजगारीला आणि गरिबीला भाजप सरकार जबाबदार असल्यामुळे त्याने हा मेसेज केला असल्याचे कबूल केले आहे.