हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पैशासाठी काही व्यक्ती कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. काहीजण पैशासाठी कोणाचाही जीव घेण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत. अशीच माणुसकीला काळिमा फासणारी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली याठिकाणी घडली आहे. दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे एकाच घरात तीन वृद्ध महिलांना डांबून ठेवत चक्क दागिन्यांसाठी आरोपीने त्यांची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे सत्यवती पाटणे (57), पार्वती पाटणे (90) आणि रुक्मिणी पाटणे (80) अशी हत्या झालेल्या वयोवृद्ध महिलांची नावे आहेत. अज्ञात चोरट्यांनी या तिन्ही वृद्ध महिलांची हत्या करून त्यांच्या अंगावरील 1 लाख 62 हजार 150 रुपयांचे दागिने चोरून नेले असल्याची नोंद पोलिसात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली पालगड रस्त्यावर असणाऱ्या वणोशी खोतवाडी या गावात केवळ 25 घरे आहेत. यातील अनेकजण कामा निमित्त मुंबईत स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे गावात सध्या केवळ चार ते पाच कुटुंबेच वास्तव्याला आहेत. दरम्यान, संक्रातीचा सण असल्यामुळे सत्यवती पाटणे (57), पार्वती पाटणे (90) आणि रुक्मिणी पाटणे (80) या तिन्ही वृद्ध महिला बाहेर गेल्या.
संक्रात असल्यामुळे या दिवशी सकाळी तिन्ही वृद्ध महिला घराबाहेर आल्या नाहीत. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या इंदूबाई पाटणे यांनी आपल्या कुटुंबीयांसह संबंधित घराची पाहणी केली. यावेळी एका महिलेचा मृतदेह हा घराच्या हॉलमध्ये तर दुसरा मृतदेह हा बेडरुममध्ये आणि तिसरा मृतदेह हा किचनमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती इंदूबाई पाटणे यांनी तत्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. तपासाअंती घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात आरोपींनी बंद असलेल्या घरात तीन वृद्ध महिलांचे अपहरण केले. तसेच त्यांना 4 दिवस ठेवले. आणि त्यांची हत्या करून मृतदेह जाळून टाकले. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.