Sunday, June 4, 2023

नाच करे बंदर, माल खाये मदारी….; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कळवा-खारेगाव उड्डाणपुलाचा काल लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे याची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्रेयवादाचे नाट्य पार पडले. यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा “नाच करे बंदर, माल खाये मदारी….”, असे ट्विट केले असून त्यांनी शिवसेनेसह मंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

काल कळवा-खारेगाव उड्डाणपुलाचा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील श्रेयवाद दिसून आला. यावरून आता राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील नेत्यांमध्ये टोलेबाजी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल रात्री एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी “नाच करे बंदर ……, माल खाये मदारी….,” असे म्हणत शिवसेना आणि शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या नेतेही काल उड्डाणपुलाच्या कायर्कर्मास उपस्थित होते. या कार्यक्रमातही भाषणादरम्यान नेत्यांनी एकमेकांविरोधात टोलेबाजी केली. त्यानंतर रात्री मंत्री आव्हाड यांनी ट्विट केरल्यानंतर वाटेवर अधिकच तापले आहे.