कराडमधील ‘त्या’ खून प्रकरणी तिघे अल्पवयीन ताब्यात; कराड शहर पोलिसांची केवळ ३ तासात कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

शहारामधील एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन संशयितांना गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ तीनच तासात ताब्यात घेतले. कराड शहर पोलिसांनी ही कामगिरी केली. सोमवार दिनांक 14 रोजी दुपारी बारा डबरी परिसरात खूनाची घटना घडली होती. आदित्य गौतम बनसोडे (वय 17, रा. बाराडबरी परिसर, कराड) यांच्या खूनप्ररकणी पोलिसांनी अल्पवयीन तिघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, बारा डबरी परिसरातील भर रस्त्यावर दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास आदित्य बनसोडे याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. त्यामुळे तो जमिनीवर कोसळला तर संशयित तेथून पसार झाले. दरम्यान, उपचारादरम्यान, आदित्य बनसोडे याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, डीवायएसपी डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मारेकर्‍यांच्या तपासासाठी पथके रवाना केली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटना घडल्यानंतर पाच तासात तर गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ तीनच तासात संशयित तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चाकू जप्त करण्यात आला आहे. याबाबत गौतम बनसोडे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास डीवायएसपी डॉ. रणजित पाटील करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment