हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आयपीएल स्पर्धेमध्ये आपल्याला नवनवीन खेळाडू पाहायला मिळतात. आयपीएल स्पर्धा हि नवीन खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी असते. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी आपले नशीब आजमावले आहे. यामध्ये काही जणांना चांगले यश मिळाले तर काही जणांच्या पदरी निराशा पडली. २००७ पासून आयपीएलला सुरुवात झाली आहे. या आयपीएलमध्ये युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी करत स्वतःला सिद्ध केले आहे. काही खेळाडूंनी तर कमी वयात १ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. यामध्ये भारताच्या तीन युवा फलंदाजांचा समावेश आहे. हे ३ खेळाडू म्हणजे राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन, दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आणि पृथ्वी शॉ हे आहेत.
ऋषभ पंत
कमी वयात १ हजार धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूमध्ये दिल्ली कर्णधार ऋषभ पंत याचे नाव आघडीवर आहे. त्याने आयपीएल २०१८मध्ये हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तेव्हा त्याचे वय २० वर्षे २१८ दिवस इतके होते. ऋषभ पंत याने काही महत्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
पृथ्वी शॉ
या यादीमध्ये ऋषभ पंतनंतर पृथ्वी शॉ याचा नंबर लागतो. पृथ्वी शॉने हा विक्रम केला तेव्हा त्याचे वय २१ वर्षे १६९ दिवस होते. त्याने आयपीएल २०१८मध्ये हजार धावा पूर्ण केल्या. पृथ्वी शॉची फलंदाजी आणि त्याची खेळण्याची पद्दत बघून त्याला आंतरराष्ट्रीय कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे.
संजू सॅमसन
या यादीमध्ये राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याचा तिसरा क्रमांक लागतो. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने आपल्या आक्रमक खेळीने तक ठोकलं आहे. जोपर्यंत संजू मैदानात तग धरून आहे तोपर्यंत प्रतिस्पर्धी संघांला विजयाची अपेक्षा नसते. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ संजू सॅमसन याची लवकरात लवकर विकेट घेण्याचा प्रयत्न करते. संजू सॅमसन याने १ हजार धावांचा टप्पा पार केला तेव्हा त्याचे वय २१ वर्षे १८३ दिवस इतके होते.